शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे उद्घाटन

By admin | Updated: October 16, 2016 00:43 IST

स्थानिक दीक्षाभूमीवर ६० व्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला शनिवारी सुरूवात झाली.

बौद्ध अनुयायांचे जत्थे दाखल : बाबासाहेबांना अभिवादन करून मिरवणूकचंद्रपूर : स्थानिक दीक्षाभूमीवर ६० व्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला शनिवारी सुरूवात झाली. या सोहळ्यासाठी जिल्ह्यात बौद्ध अनुयायांसह विदर्भातूनही जत्थे दीक्षाभूमीवर येत आहेत. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी जगात शांतता नांदण्यासाठी बुद्ध विचाराचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी केले.धम्मसमारंभाचे उद्घाटन आंबोरा येथील भदन्त डॉ. नंदवर्धनबोधी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर होते. यावेळी प्रमुख अतिथी मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, अरुणाचल प्रदेशातील भदन्त डॉ. वण्णासामी महाथेरो, संदावरा महाथेरो, उत्तमा महाथेरो, ज्योतिला महाथेरो, तेजानिया महाथेरो, अगासारा महाथेरो, विरिया महाथेरो तसेच त्रिपुरा येथील धम्मनाग थेरो, इंग्लड येथील धम्मघोष मेत्ता थेरो, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश दहेगावकर, मारोतराव खोब्रागडे, अ‍ॅड. राहुल घोटेकर आदी उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने सायंकाळी शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्वशांती, बंधुत्व प्रेरीत वाहनांसह दुचाकीवर मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जटपुरा गेटमार्गे दीक्षाभूमीकडे मार्गक्रमण करीत गेली. मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचल्यानंतर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आशुतोष सलील व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत धम्मज्योत प्रज्ज्वलन व सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली. तत्पूर्वी दीक्षाभूमीवर दुपारपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थे दाखल झाले. त्यांनी दीक्षाभूमीवरील बौद्ध विहारात दर्शन घेतल्यावर परिसरातील स्टॉलची पाहणी केली. ते बुद्ध विहारात दर्शनाला जाण्यासाठी बॅरिकेट्समध्ये रांगेत उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्ध दर्शन घेतले. दीक्षाभूमी परिसरासह आसपासच्या रस्त्यावर बौद्ध अनुयायी पंचशील ध्वज घेऊन घोषणा देताना दिसत होते. (प्रतिनिधी)अनुप्रवर्तन सोहळ्यात आज सकाळी १० वाजता : शहराच्या मध्यभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन. त्यानंतर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातू कलशासह समता सैनिक दलाचे पथसंचलन.दुपारी १.३० वाजता : सामूहिक बुद्धवंदना व धम्मप्रवचन- अध्यक्ष अ. भा. धम्म सेना नायक भदन्त आर्य नार्गाजुन सुरई ससाई, विशेष अतिथी भदन्त प्रा. डॉ. नंदवर्धनबोधी महाथेरो, अरूणाचल प्रदेशचे भदन्त डॉ. वण्णासामी महाथेरो, इंग्लड येथील भिक्खु धम्मनाग थेरो, नागपूर येथील भिक्खु धम्मसारथी, भिक्खु बोधीरत्न, भिक्खु नागाघोष, भिक्खु नागाप्रकाश व भिक्खु नागवंशसायंकाळी ५ वाजता : मुख्य समारंभ, अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, प्रमुख अतिथी अमेरिका येथील होफान अलन सेनाडके, विशेष अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. नाना शामकुळे, अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, पुणे येथील धम्मचारी मैत्रेयनाथ, अमेरिका येथील धम्मचारी वीरधम्म, हंगेरीचञया जयभीम इंटरनॅशनलचे जॅनस आर्ससरात्री १० वाजता: ‘युगपुरुष’ हा कुणाल वराळे निर्मित बुद्ध-भीम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम.आर्थिक साक्षरता अभियानबौद्ध समाजाने सामाजिक चळवळीवरच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे समाजाचे आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष झाले. ही बाब लक्षात घेऊन दीक्षाभूमीवर सोशल एज्युकेशन मुव्हमेंटतर्फे आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.पुस्तकांच्या दुकानांवर गर्दीनागपूर येथील दीक्षाभूमीवर सर्वाधिक दुकाने पुस्तकांची असतात. तेथे सर्वाधिक विक्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांविषयी पुस्तकांची होत असते. तोच प्रत्यय चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येत आहे. पुस्तकांच्या दुकानांवर सर्वाधिक गर्दी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा आदींच्या विचारांवरही आधारित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.