शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बायपास मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास

By admin | Updated: July 29, 2016 01:00 IST

वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा ...

वाहनधारकांची गैरसोय : टोल टॅक्ससाठी मार्गच केला बंद वरोरा : वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा टोल टॅक्स चुकू नये म्हणून सहारा पार्क ते शहरात जाणारा वणी बायबास रोड रेल्वे फाटक बंद करुन गेल्या काही वर्षापासून कायमच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याच मार्गावरील रेल्वे गेटच्या बंद फाटकासमोर मात्र एसटी बसचा आणि खासगी ट्रॅव्हल्सचा वणी बायपास स्टॉप म्हणून थांबासुद्धा आहेत. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा समूह, कर्मचारी वृंद आणि स्त्री-पुरुष प्रवासी दर दिवशी येथे प्रवासी वाहनातून चढ- उतार करीत असतात. असे करताना सर्वानाच दररोज धोका पत्करून रेल्वे रुळ ओलांडावा लागत आहे. सदर थांबा प्रवाशांना सोयीचा व जवळचा असल्याने, वेळ आणि रिक्षा भाडे यात बचत होत असल्याने हा वणी बायपास बंद असूनही तिथे वर्दळ सुरूच आहे. एक तर नियमानुसार रेल्वे रुळ ओलांडता येत नाही. मात्र सोयीचा व जवळचा असल्याने हा नियम तोडण्याचा मोह नागरिकांना सोडता येत नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे अपघात घडून या ठिकाणी लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. तरीही सदर बायपास वापरण्यातच येत आहे. जीवावर उदार होवून हा खेळ सोयीचा म्हणून चालू आहे. त्यामुळे जनतेची ही गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाने नियोजन करुन प्रवशांच्या सोयीकरिता या समस्येतून त्यांची सुटका करावी व रेल्वे गेटवरुन पादचारी मार्ग म्हणून लोखंडी पूल तरी रेल्वे स्टेशन पुलाच्या धर्तीवर जलद उभारावा, अशी मागणी आहे. यामुळे अपघातही टळतील व गोरगरिबांना विद्यार्थी व कर्मचारी तथा सर्वाच्याच ते सोयीचे होईल. उल्लेखनीय म्हणजे या सोबतच सदर लोखंडी पुलामुळे विनाकारण बंद असलेला रस्ता खुला होवून वरोरा शहरांचे प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या साईमंगल चौकाच्या सौदर्यात आणखी भर पडून व्यावसायीक व आर्थिक महत्वही वाढेल.(शहर प्रतिनिधी)