शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

ब्रह्मपुरी सखी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:13 IST

ब्रह्मपुरीत वार्षिक सखी महोत्सव उत्साहात पार पडला. लोकमत सखी मंच तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणी सभागृह येथे रविवारी सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीत वार्षिक सखी महोत्सव उत्साहात पार पडला. लोकमत सखी मंच तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणी सभागृह येथे रविवारी सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आरती समर्थ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेसी, नगराध्यक्ष योगीता बनपुरकरल, उद्योजिका पेशेट्टीवार, रिशीता खवले, प्रिती कऱ्हाडे, डॉ. प्रा. अमिता बन्नोरे, मनिषा बगमारे, अलका खोकले, शिला चरपटे, सखी संयोजिका साधना केळझरकर, सहसंयोजिका स्नेहा गोसावी उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर डीश डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला परीक्ष म्हणून डॉ. प्रा. आरती समर्थ तसेच डॉ. प्रा. अमिता बन्नोरे यांनी काम पाहिले. यात प्रथम क्रमांक प्रतिभा भोयर, स्वाती कोल्हे द्वितीय व अभिलाषा परकरवार यांनी तृतीय क्रमांक पटकविला. त्यानंतर गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सरीता नवघडे प्रथम, पुनम आमवार द्वितीय, यांनी पुनम घोनमोडे यांनी तृतीय क्रमांक पटकविला. एकल नृत्य स्पर्धेत प्रियंका राऊत प्रथम, मनिषा बनवाडे द्वितीय, नमिता बनकर यांनी तृृतीय क्रमांका पटकाविला. चौथी स्पर्धा युगल नृत्य मध्ये राऊत अँड ग्रृप (प्रथम) अलका प्रतिभा (द्वितीय), नमिता बनकर व पारधी (तृतीय) ठरला. त्यानंतर स्पर्धा अभीनय स्पर्धेत प्रथम क्रमांक नमीता बनकर, द्वितीय क्रमांक राऊत तर तृतीय क्रमांक पद्मा दमकोंडावार यांनी पटकविला. त्यानंतर व्यावसायिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यामधे प्रथम क्रमांक शितल नागदेवते तर द्वितीय क्रमांक रशमी झोडे यांना पटकाविला. तसेच एकल नृत्य स्पर्धेमध्ये वयोगट ३५ च्या पुढे प्रथम क्रमांक सुनीता चिचेंकर तर द्वितीय क्रमांक वंदना समर्थ व तृतीय क्रमांक अभिलाशा परकरवार यांनी पटकाविला. समुह नृत्य स्पर्धेत सुनीता आदे अ‍ॅड ग्रृप प्रथम तर द्वितीय क्रमांक डॉ. शोभणा लोकरे अ‍ॅड ग्रृप यांनी पटकाविला.सखी महोत्सवाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित होती. कार्यकारणी ग्रृपनेही यावेळी धम्माल नृत्य करून कार्यक्रमात रंगत आणली व सरते शेवटी सर्व सखींनी सामूहिक नृत्य करून कार्यक्रमाचा शेवट केला.कार्यक्रमाचे संचालन मनिषा बगमारे यांनी केले. अहवाल वाचन साधना केळझरकर, एकल नृत्य स्पर्धेचे संचालन संगीता राऊत, समूह नृत्य स्पर्धेचे संचालन प्रतिभा कसारे यांनी केले. आभार बालविकास मंचच्या संयोजिका प्रियंका मेंढे, अल्का खोकले यांनी मानले. बक्षिस समारंभाचे संचालन शीला चरपटे यांनी केले. कार्यरक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका साधना केळझरकर व सहसंयोजिका स्नेहा गोसावी, वंदना ढोमणे व कार्यकारिणी सदस्य व शहरातील सखी संयोजिकांनी सहकार्य केले.