शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बंदीतही सुगंधित तंबाखूची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. शहरातील पान टपऱ्यांना लक्ष केले जाते. परंतु सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अद्याप घेऊ शकले नाही.

ठळक मुद्देपानटपऱ्यांवर कारवाई : तंबाखूचे मोठे तस्कर मात्र मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडका लावला आहे. शहरातील पानटपºयावरील खर्राला त्यांनी लक्ष केले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध घेण्याची तसदी अद्याप त्यांनी घेतली नाही. पोलीस प्रशासनाच्या हातीसुद्धा अपवाद वगळता आजवर तंबाखूचा मोठा साठा मिळालेला नाही.जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. शहरातील पान टपऱ्यांना लक्ष केले जाते. परंतु सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अद्याप घेऊ शकले नाही. सुत्रानुसार मध्यप्रदेशातील रायपूर, दुर्ग आणि भिल्लई येथून तंबाखूची तस्करी केली जाते.मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या भागात हा तंबाखू आणला जातो. विशेषत: गडचिरोली यासाठी सुरक्षित समजला जातो. जिथून घाऊक विक्रेत्यांना आणि त्यानंतर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत तो पोहचविला जातो. चंद्रपुरात आणि बल्लारपुरातील तस्कर या घाऊक विक्रेत्यांची भूमिका बजावत असल्याची माहिती आहे. रायपूर ते गडचिरोली, गडचिरोली ते चंद्रपूरपर्यंत सुगंधित तंबाखू सुखरूप आणण्यासाठी लाखो रूपये महिन्याकाठी संबंधितांना दिले जातात. त्यामुळे आजवर या व्यापाºयांवर कारवाई झाली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.बंदी असताना जिल्हाभरात हजारो पानटपरीवर खुल्लेआम सुगंधित तंबाखू व त्यापासून तयार होणारे खर्रे मिळत आहे.तस्करीची साखळी शोधण्याची गरजपानटपºया आता रोजगाराचे माध्यम झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली की स्थानिक लोकप्रतिनिधी अडवणूक करतात. या नेत्यांचाही पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला एकच प्रश्न असतो की तंबाखू येतो कुठून, याचे उत्तर मात्र ते देवू शकत नाही. ज्यांच्या पानटपरीवर तंबाखू जप्त केला जातो. त्यांच्याकडून याची माहिती पोलिसांना मिळू शकते. ही साखळी शोधून काढता येते. परंतु पानटपरी चालकांकडून तंबाखू जप्त करण्यापलिकडे या अधिकाºयांची कारवाई पुढे जात नाही. असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे मोठे तस्कर अद्यापही पोलिसांच्या आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून दूर आहे. चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहूनच सुगंधित तंबाखूचे किरकोळ विके्रत्यांना खुलेआम वितरण केले जाते. याची माहिती पोलिसांनाही आहे. परंतु ते ही याकडे डोळेझाक करतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पानटपरीवरील कारवाईच्या निमित्ताने फाद्यां छाटण्याचे नाटक केले जाते. परंतु मुळावर घाव घालण्यात अर्थकारण आडवे येते अशी चर्चा आहे. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी