शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाचा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 21:05 IST

गोसेखुर्द धरणाचा ब्रम्हपुरी तालुक्यात जाणारा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला आहे. इ-३ ब्रांच असे या फुटलेल्या कॅनलचे नाव असून चौगान, कीन्ही, रणमोचन आणि खरकाडा या ४ गावाजवळ हा कॅनल पाण्याच्या प्रचंड दबावामुळे फुटला आहे.

ठळक मुद्देगावांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीची पूर परिस्थिती आणखी वाईट होत आहे. गोसेखुर्द धरणाचा ब्रम्हपुरी तालुक्यात जाणारा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला आहे. इ-३ ब्रांच असे या फुटलेल्या कॅनलचे नाव असून चौगान, कीन्ही, रणमोचन आणि खरकाडा या ४ गावाजवळ हा कॅनल पाण्याच्या प्रचंड दबावामुळे फुटला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. यामुळे नवी गावे पुराच्या विळख्यात सापडत आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी २५ बोटींची मागणी केली आहे. सध्या १२ बोटी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. शेकडो हेक्टर शेती, घरे पाण्याखाली आली आहेत.प्रशासनाने पुराची पूर्वसूचना न दिल्याने भीषण स्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या सर्वाधिक पूरग्रस्त लाडज गावातून नागरिकांची सुटका करणे सुरू झाले आहे. एनडीआरएफच्या सात तुकड्यांना लाडज येथे तैनात करण्यात आले आहे. सुमारे तीन दिवसांनंतर महापुराच्या वेढ्यातून लाडजवासियांची सुटका सुरू झाली आहे. प्रशासनाने पुराची पूर्वसूचना न दिल्याने भीषण स्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अजूनही लाडज गावातील शेकडो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. बचाव यंत्रणांना लाडज गावापर्यंत पोचून नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून विसर्ग मात्र अद्यापही महत्तम आहे.गोसेखुर्द धरणाच्या पुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये खाद्य पाकिटे टाकणार- विजय वडेट्टीवारहेलिकॉप्टरच्या सहाय्याने खाद्य पाकिटे-पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात येणार आहेत. सुमारे १५ हुन अधिक बाधित गावांमध्ये पुराची स्थिती बिकट आहे. मांगली या गावाचा २४ तासापासून संपर्क तुटलेला आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ३०८०० वरून २६ हजार क्यूसेक्सपर्यंत विसर्ग खाली आणला. बाधित गावातील स्थिती निवळण्यास मात्र २४ तास लागणार, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

टॅग्स :floodपूर