शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

‘खेळामध्ये विज्ञानाचे महत्त्व’ पोलीस खेळाडूंना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:51 IST

पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे शारिरीक व मानसिक दृष्ट्या मजबुत, सदृढ तसेच तणाव मुक्त राहण्याकरिता...

चंद्रपूर : पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे शारिरीक व मानसिक दृष्ट्या मजबुत, सदृढ तसेच तणाव मुक्त राहण्याकरिता सर्व जिल्ह्यात पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांकरिता क्रीडा स्पर्धाचे आयोजन केल्या जाते. नुकतेच पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. आता खेळाडूंचे लक्ष लागले ते परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे ज्या करीता पोलीस विभागात कार्यरत असलेले खेळाडू अथक परिश्रम घेत आहे. या खेळाडूचे आपल्या खेळाप्रती अधीक उत्साह व मनोबल वाढावे याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन विशेष खेळाडूंकरिता मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.सोमवारी पोलीस मुख्यालय येथील ड्रिल शेड येथे ‘खेळामध्ये विज्ञानाचे महत्त्व’ या विषयावर पोलीस विभागातील खेळाडू करिता मार्गदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख वक्ते व तज्ञ मार्गदर्शक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे सुरेश चोपणे उपस्थित होते. प्रत्येक क्रीडा प्रकारात विज्ञानाची कास धरून तांत्रिक पद्धतीचा अवलंबन करून सराव केल्यास इच्छीस यश प्राप्त करणे सहज शक्य होते. यामध्ये गुरुत्वाकर्षणासारखे भौगोलिक नियमाची जाण असणे, सरावादरम्यान आहार विहार याची विशेष काळजी घेणे, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मनाची शक्ती कशाप्रकारे वाढवावी इत्यादी विषयावर प्रमुख वक्ते, तज्ञ मार्गदर्शक सुरेश चोपणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काठे, राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक पी.दलाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्याचे पोलीस अधीक्षक यांचे हस्ते पुस्तक देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अपर पोलीस पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी केले तर आभार उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काठे यांनी मानले.जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबवून खेळाडूंचे मनोबल वाढविले जात आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्न सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)