शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठरावानंतरही अंमलबजावणी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:06 IST

नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीने नागरिक त्रस्त : रस्त्याच्या कडेला थाटली दुकाने

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरात तीन महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक विद्यालये, प्राथमिक शाळा इंग्रज कॉन्व्हेंट आहेत. हजारोंपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी शहरातील सायकलने शाळा-महाविद्यालयात जातात. शहरात वाहनांची संख्या वाढली पण रस्ते हरवून बसले. अतिक्रमणामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेड उभारणी करून त्यातच दुकाने थाटली. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. मोठे व्यापाऱ्यांची जड वाहने शहरात येतात. वाहनातून साहित्य उतरविण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील दररोज होणारी वाहतूक प्रभावित होते. दोन वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. शहरातील जड वाहतूक बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून केल्या जात होती.मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता या समस्येने गंभीर रूप घेतले. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतरण झाले. दरम्यान शहरातील जड वाहतूक बंद करण्याचा ठराव नगरपरिषदने पारीत केला होता. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. शहरातील वाहतुककोंडी लक्षात घेऊन या ठरावाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे वाटत होते. पण हा ठराव कागदावरच राहिला. मनमानी चालणाऱ्या वाहनांमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे.जडवाहतुकीला आळा बसला नाही. सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे हाल होतात. नगरपरिषद पदाधिकाºयांना ही समस्या माहिती असूनही कुणी बोलायला तयार नाही. शहरातील जड वाहतूक मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे.न. प. कार्यकारी मंडळाने यासंबंधीचा ठराव पारित केला आहे. व्यापाऱ्यांना नोटीसाद्वारे सूचना देण्यात येणार आहे. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करू.- चंद्रकांत चव्हाण,मुख्याधिकारी, न.प.नागभीड