शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:29 IST

जात पडताळणी व बोगस आदिवासी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन: आदिवासी विकास मंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जात पडताळणी व बोगस आदिवासी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवामुक्त करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. शासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर खोट्या जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत दाखल झालेल्या कर्मचाºयांचे संरक्षण तात्काळ प्रभावाने काढून टाकावे, १५ जून १९९५ व २१ आॅक्टोबर २०१५ रोजी जारी केलेले परिपत्रक रद्द करावे, याशिवाय अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरणाºया कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी. शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित व विना अनुदानित संस्था, सार्वजनिक उपक्रम, सहकारी बँक अशा विविध क्षेत्रात खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारावर दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील कर्मचारी व अधिकाºयांना त्वरीत सेवेतून काढून टाकावे, खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, अन्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राखीव जागेवर प्रवेश देताना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीविना हमीपत्राद्वारे प्रवेश दिला जात आहे. हा प्रकार बंद करावा, सहा महिन्यांची अट पूर्णत: रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी, आदिवासी विकास विभागात कर्मचारी व अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय योजनांची योग्य अंमलबजावणी केली जात नाही, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यावेळी आदिवासी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव प्रा. धीरज शेडमाके सुधाकर कन्नाके, ज्योतीराव गावडे, सारंग कुमरे, उमाजी कोडापे आदी उपस्थित होते.