शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकाने बंद होताच अवैध दारू विक्रीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST

वैध -अवैध विक्रीची तू तू मैं मैं थांबेना गोंडपिपरी : कोरोनाच्या नियमांमुळे दारू दुकानांना सकाळी ७ ते ४ वाजताची ...

वैध -अवैध विक्रीची तू तू मैं मैं थांबेना

गोंडपिपरी : कोरोनाच्या नियमांमुळे दारू दुकानांना सकाळी ७ ते ४ वाजताची मर्यादा आहे. या संधीचा फायदा काही अवैध दारूविक्रेते घेत आहे. दुपारी ४ वाजतानंतर अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठताच मद्यपींमध्ये आनंदाची लाट पसरली. अशातच जुन्या परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरणासाठी जीवाचे रान केले. अखेर यात त्यांना यश आले. जिल्ह्यात सर्वत्र अधिकृत दारूविक्री दुकाने सुरू झाली. परमिट रूम असलेले बियर बार आणि बियर शॉपी सुद्धा सुरू झाल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेळेचे निर्बंध लावण्यात आल्याने दारू दुकानांची उघडण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अशी करण्यात आली. उपरोक्त वेळात प्रत्येक दारू दुकानात, बियर बार, बियर शॉपीमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मात्र ४ वाजताच्या नंतर संपूर्ण दारू दुकाने बंद होताच मद्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या मद्यपींचा चांगलाच हिरमोड होत आहे. दारू दुकाने बंद झाल्यानंतर काही मद्यपींना मद्याचा आस्वाद घेण्याकरिता धडपड करावी लागत आहे. महागड्या किमतीने मद्य विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

दुकाने बंद होण्यापूर्वीच शहरातील व इतर ठिकाणातील जुने अवैध दारू विक्रेते या संधीचा फायदा घेत आहे. दुकाने बंद होण्यापूर्वीच दारूची साठवणूक करून ज्यादा दराने ती विक्री करीत आहे. यामुळे पुन्हा एकदा अवैध दारू विक्रीने डोके वर काढल्याचे चित्र आहे. दारूबंदी काळात प्रचंड उलाढाल करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांनी आपल्या रोजीरोटी करिता हा नवा फंडा अमलात आणल्याचे बोलले जात आहे. यामुळे दारूबंदी काळात अवैध दारू विक्री, चालू काळातही अवैध दारू विक्री सुरू असल्याने बंदी व चालू यात फरकच काय ...? असे काही सूज्ञ नागरिकांचे मत आहे. यापेक्षा दारू दुकानांची वेळ नियमित करून मद्यपींना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.