शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महावितरण कंपनीच्या खांबावरून अवैध केबलचे जाळे

By admin | Updated: January 5, 2015 23:01 IST

बल्लारपूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून केबल नेटवर्कचे जाळे अवैधरित्या पसरविण्यात आले आहे. यासाठी वीज कंपनीकडून कोणतीही

कोठारी : बल्लारपूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून केबल नेटवर्कचे जाळे अवैधरित्या पसरविण्यात आले आहे. यासाठी वीज कंपनीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तसेच गावात केबलचे जाळे पसरविण्याकरिता ग्रामपंचायतकडून परवानगी घेण्यात आली नाही. परिणामी शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.बल्लारपूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात दहा हजारांच्या वर केबल जोडणी आहे. यासाठी प्रतीमाह प्रती जोडणीसाठी १५ रुपये शासनाच्या तिजोरीत कर भरल्या जातो. प्रत्यक्षात प्रती जोडणीसाठी एक महिन्याकरिता १५० ते २०० रुपये ग्राहकांकडून वसुल केल्या जातो. या धंद्यात केबल मालक एकट्या बल्लारपूर तालुक्यात १० हजार जोडणीसाठी एका महिन्यात पंधरा लाख रुपये गोळा करतो.शासनाला मनोरंजन करापोटी एका महिन्यात केवळ दीड लाख रुपयांचा भरणा करतो. यात शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्यात येते. हा धंदा मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष का, असा नागरिकांचा सवाल आहे. शहरात व गावात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून, विद्युत तारेवरून केबल पसरविण्यात आले आहे. लोकांच्या घरावरून बेकायदेशिर केबल टाकण्यात आले आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तशी त्यांना गरजही भासली नाही. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना केवळ संचालक हाताशी धरून त्यांचे खिसे महिनेवारी गरम करून कंपनीच्या संपत्तीचा खुलेआम वापर सुरू आहे. याकडे मात्र कोणतेही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही.याबाबत बल्लारपूर येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला विचारले असता, याबाबत आपणास काहीही माहित नाही. मात्र कंपनीने शासनाच्या संपत्तीचा वापर खाजगी केबल मालकांना करण्याची मुभा दिली नाही. तसे असेल तर ते त्वरीत हटविण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)