शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीट भट्ट्यांना अभय

By admin | Updated: February 1, 2017 00:35 IST

पोंभुर्णा तालुक्यात अनेक विटभट्ट्या विनापरवाना सुरु आहेत.

शासन नियमांची पायमल्ली : लाखोंचा बुडतोय महसूलपोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यात अनेक विटभट्ट्या विनापरवाना सुरु आहेत. या विटभट्ट्यांमुळे स्थानिक परिसरामध्ये पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याची खमंग चर्चा तालुका परिसरामध्ये सुरु आहे.पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विटभट्टी लावणाऱ्यांना दरवर्षी संबंधीत ग्रामपंचायती सोबतच वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊनच विटभट्टी लावण्याची परवानगी दिली जाते. यासाठी शासकीय अनुदान शुल्क भरुन उपविभागीय अधिकाऱ्याकडून परवानगी दिली जाते. विटासाठी कोणते साहित्य लागते आणि ते वापरण्याचे काही नियम आहेत. हे नियम लक्षात घेऊन उत्खननातून माती काढावी लागते. महसूल विभागाने भरुन घेतलेल्या रॉयल्टीच्या निकषाप्रमाणेच उत्पादन काढणे आवश्यक असते. परंतु विटाचे वाढीव उत्पादन करुन शासनाचा महसूल बुडविण्याचे काम विटा निर्मिती करणाऱ्याकडून सुरु आहे. विटा व्यवसायिक या सर्व नियमांचे पालन करीत आहेत की नाही, याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची असते. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील विटाभट्ट्यातून परवान्यापेक्षाही अधिक उत्पादन सुरु आहे. जाम तुकूम येथील परिसरामध्ये तर एकाच ठिकाणी पाच विटाभट्टी लावण्यात आल्या आहेत. अनेकांनी गावालगतच आपले व्यवसाय सुरु केले आहे. यातील काही व्यक्तींना परवाना असून काही व्यक्ती विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. देवाडा खुर्द, हत्तीबोडी, झुल्लूरवार तुकूम याठिकाणी विटा व्यवसायिकांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. काही ठिकाणी तर एकत्र व्यवसाय करुन दोन लाख विटाभट्टीची रॉयल्टी काढून त्यावर पाच ते सात लाख विटांचे उत्पादन घेऊन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्या जाते. पोंभुर्णा तालुक्यामध्ये दरवर्षी जवळपास १० ते १२ च्या आसपास विटाभट्टीधारक व्यवसाय करीत असतात. प्रत्येक भट्टीवर दोन लाखापेक्षा अधिक विटांची निर्मिती केली जाते. नवीन विटांची विक्री करताना विटा विक्रेत्यांकडून जागेवर हजार रुपये प्रति हजार तर नियोजित ठिकाणी पोहोचवून देताना चार ते साडेचार हजार रुपये प्रति हजार विटांना भाव आकारला जातो. त्यामुळे विटा विक्रीची उलाढाल तालुक्यामध्ये कोटींच्या घरात होत असते. त्यांना अभय कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर काय कारवाई केली जाणार आहे, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी) अधिकाऱ्यांची चुप्पीयासंदर्भात तलाठी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांना माहिती असतानासुद्धा सर्रास विनापरवाना विटभट्ट्या सुरु आहेत. याबाबत त्यांनी चुप्पी साधली आहे.