शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे विकासाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 10, 2016 00:40 IST

शहरातील प्रोफेसर कॉलनीसह या परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी संयुक्त विकास समिती मागील २५ वर्षांपासून आंदोलन, ...

शंकर सागोरे : संयुक्त विकास समितीची पत्रकार परिषदचंद्रपूर : शहरातील प्रोफेसर कॉलनीसह या परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी संयुक्त विकास समिती मागील २५ वर्षांपासून आंदोलन, मोर्चे, पत्रव्यवहार तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत पूर्वीची नगरपालिका आणि महानगरपालिकेचे लक्ष केंद्रीत करीत आहे. परंतु मनपाचे विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप पत्रपरिषदेमधून संयुक्त विकास समितीचे कार्याध्यक्ष शंकरराव सागोरे यांनी केला आहे.प्रोफेसर कॉलनी, सुगत नगर, बुद्ध नगर, सिस्टर कॉलनी, ठक्कर कॉलोनी, मानवतानगर, न्यू शेंडे लेआऊट, हरिओम नगर, स्वावलंबी नगर, म. ज्योतिबा कॉलोनी, सावित्रीबाई फुले सोसायटी, जगन्नाथबाबा नगर आदी भागातील रस्ते, नाल्यांचे बांधकाम अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही. जगन्नाथबाबा नगरकडून स्वावलंबी नगरमधून ईरई नदीला मिळणारा मोठा नाल्याच्या दोन्ही बाजूस संरक्षत भिंत बांधण्याचे कंत्राट मंजूर झाले नाही. त्यामुळे या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी येत असते. इरई नदीचे खोलीकरण आणि नदीच्या दोन्ही बाजूचा परिसर सौंदर्यीकरण करून चौपाटीसारखे स्वरुप येईल, अशा प्रकारचा विकास करणे सर्व कॉलोन्यांमधील रस्ते हे क्राँक्रीटचे करणे, काही कॉलन्यांमध्ये नळयोजना कार्यान्वित अजूनही झालेली नाही. मनपाचे पोल आणि पथदिवे काही ठिकाणी नाही. त्यासंबंधात संयुक्त विकास समिती पाठपुरावा करीत आहे.जनतेकडून टॅक्स वसूल करणे, टॅक्समध्ये भरमसाठ वाढ करणे तसेच मनपामधील झालेला भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करावी. विकासाबाबत ज्या सामाजिक संघटना कार्य करीत आहेत, अशा संघटनांना मनपाचे विकास आराखडा बैठकीस न बोलविणे या धोरणाचा निषेध करण्यात येत आहे. आझाद बागेतील आतील रस्ते तसेच प्रवेशद्वाराजवळ खड्ड पडलेले आहेत मनपाचे मुळीच लक्ष नाही. (प्रतिनिधी)