शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाल कामगार आढळल्यास कायद्याचा आधार घ्या

By admin | Updated: June 17, 2016 01:04 IST

बालक ही राष्ट्राची उद्याची संपत्ती असून लहान मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे समाजाची जबाबदारी आहे.

पी. एस. इंगळे : जिल्हा न्यायालयात बाल कामगार दिन कार्यक्रमचंद्रपूर : बालक ही राष्ट्राची उद्याची संपत्ती असून लहान मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे समाजाची जबाबदारी आहे. हॉटेल व इतर ठिकाणी मुले मजूरी करताना आढळल्यास बाल कामगार विरोधी कायद्याचा आधार घ्या, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. एस. इंगळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने ए.डी.आर सेंटर, जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे बुधवारी आयोजित बाल कामगार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अ‍ॅड. महेंद्र असरेट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पी. एस. इंगळे पुढे म्हणाले, मुलांना चांगले शिक्षण व मानसिकता चांगली राहावी म्हणून चांगले संस्कार देणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर बाल कामगाराचे प्रश्न गंभीर स्तरावर पोहोचले आहेत, अशा परिस्थितीत बालकांची काळजी घेण्याची पहिली जबाबदारी ही त्यांच्या आई-वडिलांची आहे. त्यामुळे आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना चांगले शिक्षण, चांगले विचार द्यावे. चहाच्या दुकानात, किराना दुकाणात लहान मुल काम करताना दिसतात. परंतु आपण विरोध करत नाही, उलट त्यांनाच आपण आदेश देतो. व्यावसायिकांना तसेच मालकांना त्यांच्या कामावर कमी पैशात लहान मुले कामगार म्हणून उपलब्ध व्हावेत असे वाटते. त्यामुळे ते लहान मुलांना कामावर ठेवतात. अशा प्रसंगी संबंधीत मालकावर, उद्योजकांवर कायदेशिर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. आई-वडीलांनी लहान मुलांना कामावर न लावता त्यांना शिक्षण देवून उद्योजक, अधिकारी, डॉक्टर व वकील केले पाहिजे. सामाजिक भुमिका जर प्रत्येकाने सांभाळली तर शासनाचे धोरण यशस्वी होतील, असे ते म्हणाले.चंद्रपूरचे अधिवक्ता महेंद्र असरेट यांनी लहान मुलांना हॉटेल, दुकानात कामावर लावल्या जाते. लहान मुलांची तस्करी करुन त्यांना कमी पैशात कोणत्याही कामावर लावल्या जाते. जसे कामगार हे आपल्या हक्कासाठी संघर्ष करतात, तसे बाल कामगार हे संघर्ष करु शकत नाही. ज्या मालकांकडे लहान मुलं काम करीत असतील तर त्यांनी त्यांना सर्व सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत. युनिसेफ संघटना यांनी आपल्या अहवालात सांगितले की, जवळपास १ कोटी मुले बाल कामगार म्हणून काम करीत आहेत. आपल्या देशात बाल मजूर कायदा आहे, तरीही व्यावसायिक बालकांना कामावर लावतात. त्यातून त्यांचे काम कमी पैशात होते. शॉप इन्सपेक्टर हे दुकानाची पाहणी करतात तेव्हा त्यांना बाल मजूर आढळल्यास ते शासनाला अहवाल पाठवतात, असे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)