शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षक ठरविताना नियम डावलल्यास तीव्र आंदोलन

By admin | Updated: June 21, 2016 00:48 IST

शैक्षणिक सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक ठरविताना शासन निर्णयाचे पालन व्हावे. सेवाज्येष्ठता, ...

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा इशाराराजुरा : शैक्षणिक सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक ठरविताना शासन निर्णयाचे पालन व्हावे. सेवाज्येष्ठता, बिंदुनामावली व विषयाची निकड लक्षात घेऊन शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघाने दिला आहे.यावेळी शिष्टमंडळात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोडे, महामंडळ सरकार्यवाह जगदीश जुनघरी, दिगांबर कुरेकर, उपाध्यक्ष सुनील शेरकी यांची उपस्थिती होती.सन २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात ३४० शिक्षक, ३९ पर्यवेक्षक, १९३ उपमुख्याध्यापक, १४ मुख्याध्यापक असे एकूण ४५० शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. शिक्षक अतिरिक्त ठरवीत असताना शासन निर्णय २८ आॅगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६ व ७ मे २०१६ नुसार महाराष्ट्र राज्य शासन संहिता १९८१ मधील सूचनांचे पालन करून अतिरिक्त शिक्षक ठरविणे अपेक्षित होते. शासनाचे नियम, सेवाज्येष्ठता, बिंदुनामावलीय विषयाची निकड लक्षात घेऊन शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित होते. मात्र असे झालेले नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे व जिल्ह्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांच्या तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत. यामुळे कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये, याची खबरदारी शिक्षणाधिकारी यांनी घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना कोणावरही अन्याय होणार नाही. अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया व समायोजनाची प्रक्रिया पारदर्शी व्हावी. शिक्षकांचे १०० टक्के समायोजन होईपर्यंत नवीन पदभरतीस मान्यता देण्यात येऊ नये. परवानगी दिलेली असल्यास त्यांना मान्यता देण्यात येऊ नये. शिक्षक अतिरिक्त ठरवीत असताना व समायोजन करीत असताना संस्थांकडून व शिक्षण विभागाकडून शिक्षकावर अन्याय झाल्यास विदर्भ माध्यमिक संघ तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे व जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)