शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसेस सुरु न केल्यास आंदोलन

By admin | Updated: July 14, 2014 01:57 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याबरोबर

विद्यार्थ्यांचा इशारा : महामंडळाचे नियोजनच नाहीगडचांदूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना बसची समस्या भेडसावू लागली आहे. एकही बस वेळेवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळा शिकावायची कशी अशा विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे. गडचांदूर बसस्थानकावर ११.३० ला शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना ४ ते ५ वाजेपर्यंत उपाशीपोटी बसची वाट पाहत उभे राहावे लागते. येत्या दोन दिवसात बसचे नियोजन करुन बसेस उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.गडचांदूर आगाराकाडे बसेस उपलब्ध असताना नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दरवर्षी ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आगार प्रमुखांकडे निवेदने द्यावी लागतात ही शोकांतिका आहे. नांदा, बिबी, कोरपना, लोणी, अंतरगाव, सांगोडा, गाडेगाव, वनसडी, नारंडा, वडगाव, खिर्डी, इंजापूर, धामगाव, बाखर्डी, कवठाळा, निमणी, आवारपूर इत्यादी गावातील विद्यार्थी सकाळ व दुपार पाळीत गडचांदूर येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. वेळेच्या अगोदर किंवा नंतर अर्ध्या- एक तासाच्या अंतरावर बसेस सुटून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे शासन विद्यार्थ्यांसाठी बालकांना मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम तयार करुन लागू करीत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नसल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहे. मग शासनाचा नियम लागू कसा होणार असा सवालही विद्यार्थी करीत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कोरपना, गाडेगाव, व भोयगाव व राजुरा येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटानी बस सुटल्यास ७ वाजता गडचांदूर येथे पोहचते. तसेच गडचांदूर येथून सदर बसेस १२ वाजता सुटल्यास सर्वविद्यार्थ्यांना सोयीचे होते.विद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कोरपना, भोयगाव व राजुरा येथून सकाळी १० वाजून ४५ मिनिटानी व पालगाव- नांदाफाटा येथून ११ वाजता बस सुटल्यास ११.१५ वाजता गडचांदूर येथे पोहचते. तसेच गडचांदूर येथून सदर बसेस ५.३० वाजता सुटल्यास सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे होते. यासाठी आगाराला नवीन बसेस सुरु करण्याची गरज नसून बसेस उपलब्ध आहे. फक्य नियोजन करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)पालगाव बसचा थांबाबिबी येथे द्यावापालगाव बस नांदाफाटा येथून सुटतात. नांदाफाटा ते गडचांदूरच्या मध्यभागी फक्त बिबी येथे एकच थांबा असतो. येथून रोज २० ते ३० विद्यार्थी गडचांदूर येथे श्क्षिणासाठी जातात. मात्र नागपूर, साकोली आगाराच्या जलद बस असल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना वाकुल्या दाखवत निघून जातात. त्यामुळे या बसचा थांबा बिबी येथे देण्यात यावा.मानवविकास मिशनचे काय?राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा व जिवती या तालुक्याचा मानव विकास मिशनमध्ये समावेश झाल्याने मुलींना १२ वीपर्यंत बस पास मोफत असतात. मात्र राजुरा तालुक्यातील गावातून कोरपना तालुक्यातील गावापर्यंत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसपास मोफत मिळत नाही. त्यामुळे राजुरा आगाराने नेमकी योजना कशी आहे. याबद्दल विद्यार्थीनींना माहिती देऊन निदान राजुरा तालुक्यातील चंदनवाही, हरदोना (खु.), हरदोना (बु.) या गावातील विद्यार्थीनींना गडचांदूरपर्यंत येण्यासाठी मोफत बसपास योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. कारण ही गावे राजुरा तालुक्यात येतात आणि राजुरा तालुक्याचा समावेश मानव विकास मिशनमध्ये झाला आहे. थांबा असणाऱ्या बसेस द्याराजुरा, कोरपना, भोयगाव व पालगाव याठिकाणाहून येणाऱ्या सर्व बसेस प्रत्येक गावात थांबा असणाऱ्या असाव्या, कारण अनेक बसेस खाली असतात. मात्र थांबा नसल्याने रस्त्यावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. त्यामुळे थांबा असणाऱ्याच बसेस देण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.