शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास भरावा लागेल दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:28 IST

अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, दारु पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की, भ्रष्टाचार फोफावणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देवाहतूक नियम कडक : वाहनधारकांना पाळावा लागणार नियम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट अधिक दंड आकारला जाणार असून रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास दहा हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. विशेषत: अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, दारु पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की, भ्रष्टाचार फोफावणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केला आहे. केंद्राचा हा कायदा १ सप्टेंबरपासून लागू करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे.अल्पवयीन मुलांच्या हातून अपघात झाल्यास पालकांना शिक्षापूर्वी अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास केवळ ५०० रुपये दंडाची तरतुद होती. परंतु आता नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतुद आहे. पूर्वी दारु पिऊन वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड होता, आता तो १० हजारावर गेला आहे.ट्रिपल सिटला दोन हजारांचा दंडट्रिपल सिट बसवून दुचाकी चालविणाऱ्यांना आता खिशात २ हजार रुपये ठेवावे लागणार आहे. पूर्वी हा दंड केवळ शंभर रुपये होता. तसेच पूर्वी सिंग्नल न पाळणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यावर शंभर रुपये दंड होता. आता तो ५०० रुपये करण्यात आला आहे. सिटबेल्ट न बांधणाऱ्यांना नव्या कायद्यानुसार एक हजार रुपये, विना विमा वाहन चालविणे दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

असा आहे दंडहेल्मेट न घातल्यास हजार रुपये, सिंग्नल तोडल्यास ५०० रुपये, लायसन्स नसताना वाहन चालविल्यास, वेगाने वाहन चालविल्यास, झिकझॅक पद्धतीने वाहन चालविल्यास ५ हजार रुपये, दारु पिऊन वाहन चालविल्यास १० हजार रुपये, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जणांना बसविल्यास दोन हजार रुपये, रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास १० हजार रुपये, विमा नसताना वाहन चालविल्यास दोन हजार रुपये, वाहन चालवितना मोबाईल वापरल्यास पाच हजार रुपये, मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास २० हजार रुपये.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस