शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवचेतना मिशन शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श

By admin | Updated: August 29, 2015 01:16 IST

शिक्षण हे माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी असते. नवचेतना मिशन प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून जिल्हा परिषदेने सुरु केलेले नवचेतना मिशन...

सुधीर मुनगंटीवार : जिल्हा परिषदेच्या नवचेतना मिशनचा प्रारंभचंद्रपूर : शिक्षण हे माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी असते. नवचेतना मिशन प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून जिल्हा परिषदेने सुरु केलेले नवचेतना मिशन राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नवचेतना मिशनच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, डॉ. विजय देवतळे, विजय वानखेडे, शांताराम चौखे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यावेळी उपस्थित होते.यावेळी नवचेतना मिशनचा लोगो, घडीपत्रिका व संकेतस्थळाचे लोकार्पण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयावर मिशनचा फोकस असणार आहे. यासाठी शिक्षकांची थिंक टँक तयार करण्यात आली असून मराठी, इंग्रजी व गणित विषय ब्रिगेड तयार करण्यात आल्याचे सांगितले. जिल्ह्यात १५७१ शाळांमध्ये एक लाखांच्यावर विद्यार्थी आहेत. त्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी हे मिशन कार्य करणार आहे. या मिशन मध्ये विद्यार्थी व शिक्षकांना नवरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. नवचेतना मिशनचा गुणवत्ता दर्शक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी असून दोन वर्षांनंतर या कार्यक्रमाचे मूल्याकंन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)योजना राबवा,  निधी देऊराज्य सरकार पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त निधी शिक्षणक्षेत्रासाठी खर्च करते, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. राज्यातील प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या जिल्ह्यात झाली पाहिजे, असा आपला मानस आहे. यासाठी जिल्हा परिषदेने चांगल्या योजना राबवाव्यात, निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. मिशन नवचेतनामुळे शिक्षकांना अधिक मेहनत करावी लागेल, तुमचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. इतर जिल्ह्यातील लोक शाळा बघायला आपल्या जिल्ह्यात यावेत, असे काम करा. शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल या मिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास या मिशनची खूप मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.