शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आयएएमएचा पदग्रहण सोहळा

By admin | Updated: April 8, 2015 00:03 IST

येथील गंज वॉर्डातील आय.एम.ए. सभागृहात शनिवारी चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सर्जन डॉ. अशोक भुक्ते व सचिव म्हणून फिजीशियन डॉ. प्रसाद पोटदुखे ....

सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार : १५ गरजू मुली शिक्षणासाठी दत्तकचंद्रपूर : येथील गंज वॉर्डातील आय.एम.ए. सभागृहात शनिवारी चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सर्जन डॉ. अशोक भुक्ते व सचिव म्हणून फिजीशियन डॉ. प्रसाद पोटदुखे यांनी मावळते अध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस व सचिव डॉ. विश्वास झाडे यांचेकडून पदभार स्वीकारला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी युएनआयसीईएफचे को- आॅर्डीनेटर डॉ. अरुण आमले होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर राखी कंचर्लावार व राज्याचे अर्थ- नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.प्रास्ताविक मावळते अध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस यांनी केले. वर्षभरात आय.एम.एतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा सचित्र अहवाल मावळते सचिव डॉ. विश्वास झाडे यांनी सादर केला. तद्नंतर पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आय.एम.ए. परिवारातर्फे शाल श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व सभासदांना शुभेच्छा दिल्या.यावेळी चंद्रपूर आय.एम.ए.ने सुरू केलेल्या शिक्षण मंगल सुकन्या योजनेअंतर्गत १५ डॉक्टरांनी १५ गरजु सुकन्या शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेतल्या. पाहुण्यांचा परिचय डॉ. स्नेहल पोटदुखे व डॉ. नरेंद्र कोलते यांनी करून दिला. संचालन पियूष मुत्यालवार व डॉ. प्रीती चव्हाण यांनी केले. आभार सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)