शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेच्या धास्तीने लग्नसोहळे उरकण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

विकास खोब्रागडे पळसगाव (पिपर्डा) : जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये लग्नाचे मुहूर्त असतात. मार्च आणि जूनपर्यंत लग्नसराई जोरात असते. ...

विकास खोब्रागडे

पळसगाव (पिपर्डा) : जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये लग्नाचे मुहूर्त असतात. मार्च आणि जूनपर्यंत लग्नसराई जोरात असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून लग्नसराईला कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. अनेक विवाह सोहळे अगदी चार ते पाच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने पार पडले. मात्र, यावेळेस संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धास्तीने ग्रामीण भागामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच लग्न सोहळे उरकण्याची घाई वर व वधू पक्षांमध्ये दिसत आहे.

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्यामुळे ग्रामीण भागात सध्या ‘ना लग्न पत्रिका, ना मंगल कार्यालय, ना बँडबाजा’ अशा परिस्थितीमध्ये लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लग्नसराईत विवाह मुहूर्ताची मोठी रेलचेल दिसून येत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच लग्न उरकण्यासाठी व अपेक्षित स्थळे मिळविण्यासाठी वधू व वर पक्षाकडील मंडळींची मोठी धावपळ दिसू लागली आहे. कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे गेला नसल्याने कमी खर्चात व मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य आटोपले जात आहे. लग्नाच्या प्रत्येक गोष्टीवर कोरोनाने मर्यादा आणल्या आहेत. पाहुण्यांची उपस्थित कमी झाल्याने कपडे खरेदी, जेवण व्यवस्था, बांगड्या, मंगल कार्यालय, वाजंत्री आदी व्यवसायांवर संक्रांत आली आहे. लग्नसोहळ्यामध्ये कोरोना संसर्गाचे नियम पाळणे बंधनकारक असल्याने सध्या लग्न साध्या पद्धतीने होत आहेत. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर लग्न झाल्याचे लोकांना कळते.

बॉक्स

वधू शोधताना दमछाक

स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींच्या जन्मदरात घट झाल्याने वर पक्षाची वधू शोधताना चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे एखादे स्थळ चांगले दिसले की लवकर लग्न उरकण्याची लगबग सुरू होते. अनेक जण दिवाळीनंतरच लग्नकार्य आटोपण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

220921\navbharat-times-1.jpg

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धास्तीने लग्न सोहळे उरकणात वधूवर