शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रानटी डुकरांची शिकार, तिघांना अटक

By admin | Updated: July 14, 2016 00:53 IST

तळोधी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नेरी-सावरगाव शेतशिवारातील रोडलगत रानटी डुकरांची भरमारने (बंदुक) शिकार करून

दोन जण फरार : नेरी-सावरगाव रोडलगतची घटना तळोधी (बा.)/नेरी : तळोधी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नेरी-सावरगाव शेतशिवारातील रोडलगत रानटी डुकरांची भरमारने (बंदुक) शिकार करून मांसाची विल्हेवाट लावण्याच्या बेतात असलेल्या तिघांना वनविभागाच्या चमूने अटक केली. तर दोघे जण फरार होण्यात यशस्वी ठरले. ही कारवाई बुधवारी सकाळी ८ वाजता करण्यात आली. कन्हैखा सिंग जयसींग भोंड रा. नेरी (५९), गंगाधर गोपाळराव झोडे (४५) रा. सावरगाव व मनोहर लक्ष्मण सुकारे (४१) रा. सावरगाव (माले) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. चिमूरपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरी-सावरगाव शेतशिवारात जंगली डुकराची शिकार होत असल्याची गुप्त माहिती ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक आशीष ठाकरे, सहायक वनसंरक्षक एस.बी. पंधरे यांना मिळली. त्यांनी तळोधी वनपरिक्षेत्राचे आरएफओ ए.एच. सोनटक्के यांना दिली. या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. सोनटक्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून धाड टाकली. यात घटनास्थळावरच आरोपी डुकराच्या मांसाची विल्हेवाट लावत असताना आढळले. दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तीन जण सापडले. आरोपींनी चार डुकरांची शिकार केली. यापैकी तीन डुकरांना हलविले होते. घटनास्थळावर एकच डुक्कर वनअधिकाऱ्यांना मिळाले. तिघांनाही अटक करून त्यांच्याकडून भरमार बंदुक हस्तगत केली. ही कारवाई तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. सोनटक्के यांच्या नेतृत्वात तळोधीचे क्षेत्र सहायक नरड, गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक पी.एम. खोब्रागडे, चिमूरचे क्षेत्र सहायक व्ही.टी. धुर्वे यांनी केली. आरोपींवर वननियम कलम २, ९, ५०, ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)