शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिकार केली पण तोच झाला शिकार; बिबट पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 23:14 IST

ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. या भागात बिबट्याचीही मोठी दहशत आहे. गावातून लहान मुलांना बिबट्याने खेळताना उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट रात्री शेळ्या वा कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी गावात येतात. किटाळी (बोडदा)  हे जंगलव्याप्त गाव आहे. या गावात रात्रीच्या सुमारास एक बिबट शिकार शोधण्यासाठी आला.

रवी रणदिवेलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शिकारीच्या शोधात गावाच्या परिसरात आलेला बिबट विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रातील किटाळी गावात पहाटेला घडली.  गावकऱ्याला पडल्याचा आवाज आला असता विहिरीत चक्क बिबट दिसला. तो विहिरीबाहेर पडण्यासाठी धडपडत होता. ही बाब वनाधिकाऱ्यांना दिली. यानंतर वनविभागाचा सुमारे ३० जणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात वनविभागाला यश आले. यानंतर त्याच जंगलात बिबट्याला सोडण्यात आले.ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. या भागात बिबट्याचीही मोठी दहशत आहे. गावातून लहान मुलांना बिबट्याने खेळताना उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट रात्री शेळ्या वा कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी गावात येतात. किटाळी (बोडदा)  हे जंगलव्याप्त गाव आहे. या गावात रात्रीच्या सुमारास एक बिबट शिकार शोधण्यासाठी आला. त्याने गावातच कोंबड्याची शिकार केली. शिकार तोंडात घेऊन जंगलाच्या दिशेने धूम ठोकत असताना बिबट संतोष मेश्राम यांच्या घराशेजारील एका खोल विहिरीत पडला. पडल्याचा आवाज ऐकूण संतोष विहिरीजवळ गेला असता त्याला बिबट पडल्याचे दिसले. कठड्यापासून सुमारे १५ फूट खोल पाणी असल्यामुळे त्याला बाहेर निघता येत नव्हते. बिबट विहिरीतून बाहेर निघण्यासाठी धडपडत असल्याचे दिसले. माहिती होताच  गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. ब्रह्मपुरी दक्षिणचे वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, उत्तरचे वनपरिक्षेत्राधिकारी गायकवाड, रिसर्चचे राकेश आहुजा तसेच सिंदेवाही येथील वनविभागाचा ताफा लगेच घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी असलेली गर्दी बाजुला करून विहिरीत मोठ्या शिताफीने पिंजरा सोडला. बिबट अलगद त्या पिंजऱ्यात शिरताच दार बंद केले. पिंजरा बाहेर काढून त्याची तपासणी केली. तो सुखरुप असल्याचे पाहून त्यांला जंगलाच्या दिशेने मुक्त करण्यात    आले.

 

टॅग्स :leopardबिबट्या