शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्जन करणाऱ्या प्राध्यापकांवर उपासमारी

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

मागील १४ वर्षापासून शासनाने सुरू केलेल्या ‘कायम’ विना अनुदानित तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी घेतलेल्या सहविचार सभेत ...

विनावेतन काम : १४ डिसेंबरपासून आमरण उपोषणचंद्रपूर : मागील १४ वर्षापासून शासनाने सुरू केलेल्या ‘कायम’ विना अनुदानित तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी घेतलेल्या सहविचार सभेत येत्या हिवाळी अधिवेशन काळात १४ डिसेंबरपासून नागपूर येथील पटवर्धन ग्राऊंडवर सामूहिक आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.कायम विना अनुदानित तत्त्वावर वाटण्यात आलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या खैरातीमुळे शिक्षणाचा प्रसार तर होत आहे. परंतु या महाविद्यालयात कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचे जीवन मात्र निराशेच्या गर्तेत लोटले गेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार व सेवा म्हणून नोकरी स्विकारली खरी; परंतु आज ना उद्या अनुदान प्राप्त होईल, अशी आशा बाळगत त्यांनी आपली सेवा कायम सुरू ठेवली. त्यातच सन २०१३ मध्ये ‘कायम’ शब्द वगळला गेला आणि प्राध्यापकांच्या आशा पल्लवित झाल्या. लगेच मुल्यांकन प्रक्रियासुद्धा पार पडली. त्याचा निर्णय मात्र १ वर्षावरील कार्यकाळ लोटूनही शासनाकडून देण्यात आला नाही. परिणामी हे सोंग कशासाठी, असा प्रश्न या हतबल प्राध्यापकांना पडला आहे. शासनाकडून चालत असलेल्या दिरंगाईमुळे शासनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विना अनुदानित कृती समिती शाखा चंद्रपूर, नागपूर विभागातर्फे येत्या १४ डिसेंबरला सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन म्जिल्हाध्यक्ष प्रा. ए.बी. अलगमकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. एस.यु. कुंभारे, जिल्हा सचिव प्रा. बी.एस. मालेकर, प्रा. प्रकाश लालसरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)