शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

दीडशे कामगारांना कंपनीत प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:30 IST

मोहबाळा गावालगत असणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी मागील आठ वर्षांपासून वीज निर्मितीचे काम करीत आहे.

साई वर्धा पॉवर येथील प्रकार : प्रहारच्या नेतृत्वात निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मोहबाळा गावालगत असणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी मागील आठ वर्षांपासून वीज निर्मितीचे काम करीत आहे. सदर कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर कामगार कार्यरत असून कंपनीत अनेक सहकंपन्या कार्यरत आहेत. यातील चेन्नई राधा या कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे ३० जून २०१७ पासून इन्कॉटेक नावाची कंपनी त्या कंपनीच्या जागेवर काम करणार आहे. मात्र ही कंपनी जुन्या कंपनीत कार्यरत कामगारांना मुलाखती घेऊन कामावर ठेवणर आहे. तशी नोटीस इन्कॉटेक कंपनीने कंपनीच्या नोटीस बोर्ड लावण्यात आली होती. मात्र कुठलीही मुलाखत न घेता २१ जुलैपासून कामगारांना कंपनीत प्रवेश बंदी करण्यात आल्याने कामगारात रोष निर्माण झाला आहे.दरम्यान, आज सोमवारी कंत्राटी कामगारांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून १५० कामगार कंपनी बाहेर असून कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कंपनीत प्रवेश बंदी केली. हे काम बेकायदेशीर असून सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, असे निवेदनात लिहिले आहे. २००९ पासून हे सर्व कामगार चेन्नई राधा या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून स्थायी काम करीत आहे. या काळात अनेक कंत्राट बदलले. पण कामाचे स्वरूप तेच राहायचे. पण यावेळी नवीन आलेल्या इन्कॉटेक कंपनीने कामगारांना सरसकट कंपनीत प्रवेश बंदी केली. यामुळे कामगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पूर्ववत कामावर न घेतल्यास व योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी निवेदनातून दिला आहे. चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दिला चोप२१ जुलैला कामगारांना कंपनीत प्रवेशबंदी केल्यानंतर सर्व कामगारांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरु असताना कंपनीतील सुरक्षा रक्षक चित्रीकरण करीत असल्याचे एका कामगाराच्या निदर्शनास आले. त्याला याबाबत कामगारांनी विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चित्रीकरण करण्यास पाठविले, असे सांगताच संतप्त कामगारांनी त्याला चांगलाच चोप दिला. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंदणी केली.