शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्ली तहसीलवर धडकले शेकडो ट्रॅक्टरधारक

By admin | Updated: August 26, 2015 00:47 IST

गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणून जिल्ह्यातील सुशिक्षित ट्रॅक्टरधारक बेरोजगारांना खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देण्यात यावे, ...

तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : गौण खनिज कायद्यात बदल कराएटापल्ली : गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणून जिल्ह्यातील सुशिक्षित ट्रॅक्टरधारक बेरोजगारांना खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन ट्रॅक्टर मालक-चालक संघटना एटापल्लीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, १०० हून अधिक ट्रॅक्टरधारक ट्रॅक्टरसह तहसील कार्यालयावर धडकले.शासनाने नवा शासन निर्णय जारी करून गौण खनिज वाहतूक व उत्खननासंदर्भात ट्रॅक्टरधारकांवर जाचक अटी लादल्या. त्यामुळे रेती व इतर गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कठीण झाले आहे. यामुळे एटापल्ली तालुक्यातील ट्रॅक्टरधारकांनी गेल्या अनेक दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान, अनेक ट्रॅक्टर मोकळ्या जागेत उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. मात्र ट्रॅक्टर मालक-चालक संघटनेच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांपुढे उपासमारीची समस्या निर्माण झाली. अखेर संतप्त ट्रॅक्टरधारकांनी मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर ट्रॅक्टरसह मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. ट्रॅक्टर मालक-चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना कार्यालयात भेटून त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. तसेच एटापल्लीचे नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, डी. आर. म्हैत्रे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन देताना ट्रॅक्टर मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष विलास चिटमलवार, पं. स. सभापती दीपक कुलसंगे, पं. स. उपसभापती संजय चरडुके, रमेश गंपावार, दौलत दहागावकर आदींसह जारावंडी, हालेवरा व गट्टा परिसरातील ट्रॅक्टर मालक उपस्थित होते. ट्रॅक्टरसह निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील सर्व ट्रॅक्टर मालक-चालक व ट्रॅक्टरवरील मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)काय म्हटले आहे निवेदनात ?खासगी वित्तीय कंपन्यांकडून एटापल्ली भागातील अनेक बेरोजगार युवकांनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. एटापल्ली तालुक्यात २०० हून अधिक ट्रॅक्टरची संख्या आहे. या ट्रॅक्टरच्या साहाय्याने गरजू नागरिकांना गौण खनिजाचा पुरवठा केला जातो. मात्र शासनाने नवा शासन निर्णय जारी करून गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात आमच्यावर जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांच्या २०० कुटुंबासह मजुरांच्या दोन हजार कुटुंबांवर तसेच घर बांधकामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या १० ते १५ हजारो मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. नवे शासन अधिनियम हे शहरी भागांना अनुसरून जारी करण्यात आले. मात्र गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने गौण खनिजाबाबतच्या जाचक अटी रद्द करून सुशिक्षित बेरोजगारांना परवाने द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे ट्रॅक्टर मालक व चालकांनी केली आहे.