शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे शेकडो टन धान्य पावसात भिजले

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत.

जमिनीवर उतरविले धान्य: कंत्राटी कंपनीचा संतापजनक प्रतापचंद्रपूर: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत. काही धान्य तर चिखलात मिसळून खराब झाले. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उजेडात आला. या संतापजनक प्रकाराला वखार महामंडळ व संबंधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर हे धान्य वाटप केले जाते. विविध राज्यातून हे धान्य रेल्वेच्या माध्यमातून आणले जातात. रेल्वे रॅक पार्इंटवर हा माल उतरवून तो तात्काळ ट्रकमध्ये लोड केला जातो व ट्रकद्वारे पडोली येथील शासकीय गोदामात साठविला जातो. यासाठी प्रशासनाकडून कंत्राट दिले जाते. मात्र कंत्राटदारांकडे धान्य नेण्यासाठी ट्रकसारखे मोठे वाहन असणे बंधनकारक असते. रेल्वे रॅक पार्इंटवरून धान्य लोड करण्याचे कंत्राट सध्या एस.के. ट्रान्सलाईन या जळगाव येथील कंपनीला दिले आहे. या कंपनीने जळगाव येथील ट्रकचे क्रमांक देऊन हे कंत्राट मिळवून घेतले. वास्तविक या कंपनीकडे ट्रक फारच कमी असल्याची माहिती आहे.काल मंगळवारी मध्यप्रदेशातून सुमारे ९०० टन गहू रेल्वेने येथील रेल्वे रॅक पार्इंटवर आणण्यात आला. रेल्वेने हे धान्य आल्यानंतर नऊ तासात ते ट्रकमध्ये लोड करावे लागतात. मात्र संबंधित कंत्राटदारांनी हा ९०० टन गहू काल येथील रेल्वे पार्इंटवर जमिनीवरच उतरविला. वास्तविक काल सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शिवाय पावसाळ्याचेही दिवस सुरू आहेत. असे असतानाही एस.के. ट्रान्सलाईन या कंत्राटी कंपनीने हा माल जमिनीवर डॅम्प केला. अपेक्षेप्रमाणे काल सायंकाळी दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे ९०० टनपैकी शेकडो टन धान्य या पावसात भिजत राहिले. वास्तविक या रेल्वे रॅक पार्इंटवर धान्य येणे, हे धान्य सुखरुप शासकीय गोदाम पोहचविणे, ही जबाबदारी वखार महामंडळाची असते. याचे कंत्राट दिले असले तरी त्यावर देखरख वखार महामंडळच ठेवते. पावसाचा अंदाज असताना वखार महामंडळाने एवढे मोठे धान्य जमिनीवर उतरविण्याची परवानगी कशी काय दिली, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पार्इंटवरील याच जमिनीवर रासायनिक खते उतरविली होती. तिथेच गहू उतरविला. जिथे गहू पडून होता तिथे पाणी साचून होते. हाच गहू बाहेर काढून वाळवून पुन्हा तो गरिबांच्या माथी मारला जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)