शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

By admin | Updated: July 13, 2016 01:59 IST

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला.

चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले : विसापूर, कळमना, कोठारीत जास्त नुकसान बल्लारपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला. अतिवृष्टीने पळसगाव येथील दोन कुटुंबाचे, कोठारी येथील एकाचे तर विसापूर येथे एका कुटुंबाचे घरे जमीनदोस्त झाल्याने स्थानिक व तहसील प्रशासनाने सुरक्षितस्थळी तात्पुरता निवारा दिला आहे. बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात १०० वर घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बल्लारपूर शहरात विविध वॉर्डात १५ ते २० घरांची पडझड झाली असून दोन घरे पूर्णता पडली आहेत. पळसगाव येथील संतोष घोडे व झिंगुबाई घोडे यांचे घर पडल्याने दोन्ही कुटुंबाना गावातील समाज मंंदिरात निवारा देण्यात आला. विसापूर येथील रविंद्र कष्टी व भाऊजी कष्टी यांचे घरे पडली असून शेजाऱ्यांच्या घरी आसरा घेतल्याची माहिती आहे. कोठारी येथील एका कुटुंबाला निसर्गाने निवारा हिरावल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. विसापूर, चुनाभट्टी येथील नागरिकांचे २० ते २५ घरे अशंंता पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कळमना, कोठारी, नांदगाव (पोडे), किन्ही, कोर्टीमक्ता, बामणी (दुधोली), पळसगाव, गिलबिली, मानोरा आदी गावातील १०० वर घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने तहसीलदार विकास अहीर यांनी तलाठी विनोद गणफाडे, आर.जी. चव्हाण, शंकर खरुले, शकुंतला कोडापे यांच्यासह पंचायत समितीचे अभियंता श्रीवास्त, नगर पालिकेचे अभियंता यांना पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, असे तहसीलदार विकास अहीर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) चारगाव व हडस्तीचा संपर्क तुटला वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी इरई नदीवरील चारवट व हडस्ती गावाकडे जाणाऱ्या पुलावर पाच ते सहा फुट पाणी असल्याने बल्लारपूर तालुक्याशी मंगळवारी सकाळपासून संपर्क तुटला. विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती व बल्लारपूर येथील शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. अशीच स्थिती वर्धा नदीच्या काठावरील दहेली, लावारी, कळमना, आमडी, कोठारी, पळसगाव येथे निर्माण झाली आहे. हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.