शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो गुरुजींनी ठोकला मुख्यालयाला रामराम

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या मुलांना समान व दर्जेदार शिक्षण मिळावे, कुणीही यापासून वंचित राहू नये.

शासन नियमाची पायमल्ली : शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार जिवती : राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या मुलांना समान व दर्जेदार शिक्षण मिळावे, कुणीही यापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षण विभागाकडून विविध क्षेत्राच्या माध्यमातून जनजागृती होताना दिसते. तर दुसरीकडे मात्र पहाडावर दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्याच्या कारणावरुन जिवतीत व परिसरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारीसह शेकडोच्यावर गुरुजींनी मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला रामराम ठोकत शहर गाठल्याचा प्रकार सध्या दिसून येत आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम आणि मागासलेला तालुका म्हणून सर्वत्र परिचित आहे. परिसरात राहणाऱ्या संपूर्ण नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने सगळ्यांचीच आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. आई- वडीलही अज्ञानी असल्याने घरी त्यांना कोणीही शिक्षणाविषयी माहिती देत नाही. आजपर्यंत शिक्षकांनीच आपली भूमिका चांगली निभावली. अजूनही निभावतील अशी आशा आहे. पण दिवसेंदिवस तालुक्याची स्थिती खराब होताना दिसत आहे. बाजारपेठ मंदावत आहे. दिवसभर वाटणारी वर्दळ कुठे तरी नाहिसी होताना दिसत आहे. चार चौघात शिक्षणाचे गप्पा ठोकणारा गुरुजी आता अपडाऊनच्या प्रवाशाला लागल्याने पहाडावरील शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आता ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. शालेय मिटींग, डाक पोहचविणे इत्यादी कामाचे बहाणे करीत शिक्षकही शाळेत उशिरा जाणे, मोजकच शिकविणे, आणि वेळेच्या आता शाळा बंद करुन परतीच्या मार्गाला लागणे, अशा प्रकारामुळे पहाडावरच्या गुरुजीवरचा विश्वास कमी होवू लागल आहे. स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडणाऱ्या गुरुजींनी आमच्या मुलांना कुठला शिक्षण देतात? खरच आमच्या मुलांच्या दर्जेदार शिक्षण मिळतोय काय? अपडाऊनच्या प्रवासातून खरच गुरुजी मन लावून शाळेत शिकवित असेल काय? यावर शिक्षण विभागाने चिंतन करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)