शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींमुळे शेकडो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : २ लाख थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती ...

ठळक मुद्देराजुरा तालुक्याची यादी जाहीर : निकषात बसणाºया रकमेची नोंदच नाही

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : २ लाख थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. यामध्ये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची नावे नसल्याचे समोर आले. काही शेतकऱ्यांकडे कर्ज असूनही कर्जमाफीच्या निकषात बसणारी रक्कम न दाखविता कमी रकमेची कर्जमाफी नोंदविली. त्यामुळे कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यामुळे यादी केव्हा प्रकाशित होणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, नुकतेच या याद्या प्रकाशित झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन संबंधित शेतकऱ्यांनी बँक पासबुक व आधार प्रमाणिकरणही पूर्ण केले. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडे कर्जमाफीची कमी रक्कम याद्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफी झाली की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जमाफीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी रक्कम दाखविण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी जास्त कर्ज घेऊनही त्याची कमी रक्कम सदर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार का, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे.जाचक अटींचा फटकाशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची ही योजना शासनाच्या जाचक अटींमुळे लाभदायक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा सूर शेतकरी वर्गात ऐकायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे ते आनंदित झाले आहे. बहुसंख्य पात्रताधारक शेतकºयांपर्यंत शासनाची कर्जमुक्तीची योजना पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.शासनाने थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती योजनेच्या याद्या गावात प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु कर्जाची जादा रक्कम घेऊनही यादीमध्ये कर्जाची रक्कम कमी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत शंका आहे.- सुरेंद्र पिंपळकर,शेतकरी, गोवरीकाही शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत कर्ज घेतले. अशा शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची रक्कम यादीत कमी दाखविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर तक्रार करावी. लवकरच निवारण केले जाणार आहे.- डॉ. रविंद्र होळी,तहसीलदार, राजुरा

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी