शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी; गहू, तांदळासह तूप, तेल महागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या धोरणामुळे डिझेलच्या दरात वाढली. परिणामी, मालवाहतुकीचे दरही चढे झाल्याने यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावरच गहू, तांदळासह, तूप व तेल महाग होऊ शकते. कोरोना संकटापासून सावरणे सुरू असताना हे नवेच संकट निर्माण झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली. याचा अनिष्ट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे गहू, तांदूळ, डाळी, तेल, तूप, शेंगदाणा व अन्य तेलजन्य पदार्थांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. भाजीपाला सध्या स्वस्त आहे. येत्या काही दिवसांत त्याच्याही किमती गरिबांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबे हातावर आणून पानावर खाणारी आहेत. अशा कुटुंबांना या महागाईची सर्वाधिक झळ बसणार आहे. नोकरदार वर्ग हा खर्च पेलू शकेल. पण गरिबांचे काही खरे नाही, या दिशेने बाजाराची वाटचाल सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

डिझेल शंभरीपार

- डिझेलच्या दरात वाढ झाल्याने चंद्रपूरच्या बाजारावरही परिणाम जाणवू लागला. सध्या प्रति लिटर ९९.१३ पैसे असा दर आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वाढण्याची भीती आहे.

मालवाहतूक टक्क्यांनी वाढली- पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की वाहतुकीचे दर चढे होतात. दिवाळीच्या तोंडावर व्यापारी मालाचा साठा करीत आहेत. मालवाहतुकीचे दर २१ टक्क्यांनी वाढल्याने येत्या काही दिवसांत त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवणार आहे. 

किराणा महागणार

चंद्रपूर जिल्ह्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, नागपूर तसेच पंजाबमधून धान्याची आवक होते. साखर, तेल, विविध प्रकारच्या डाळी इटारसी, बैतूल, हैदराबाद येथूनही आणल्या जातात. परराज्यातून मालवाहतूक करण्याचे दर वाढले. यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमती भडकू शकतात.

 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल