शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरी तालुक्यात शेकडो फेरफारची प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

गोंडपिपरी : तालुक्यातील शेकडो फेरफार प्रकरणे महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या जागेवर ताबा घेण्यापासून ...

गोंडपिपरी : तालुक्यातील शेकडो फेरफार प्रकरणे महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या जागेवर ताबा घेण्यापासून वंचित रहावे लागत आहे. हा सारा प्रकार मागील वर्षापासून सुरू आहे.

त्यामुळे हे प्रलंबित फेरफार प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. महसूल प्रशासनाच्या संबंधित फेरफारची प्रकरणे मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांची न्यायालयीन प्रकरणे, बोझा कमी करणे, खरेदी-विक्री यासह अनेक प्रकारची कामे रेंगाळली आहेत. फेरफार प्रकरण १५ दिवसांपर्यंत निकाली काढणे हे महसूल प्रशासनाचे काम आहे. मात्र, हा सारा प्रकार मागील वर्षापासून थांबून आहे. शेतकऱ्यांचा कणा म्हणजे, महसूल प्रशासन. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना त्यांच्या उदासीनतमुळे हा प्रकार घडत आहे. अनेक शेतकरी दररोज कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, संबंधित अधिकारी तहसीलदारांचे थम्ब आले नसल्याचे सांगून वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व फेरफारची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मागणी गोंडपिपरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा तालुका अध्यक्ष आकाश चौधरी यांनी केली आहे.

यासंदर्भात सभेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार के. डी. मेश्राम यांची भेट घेतली. सविस्तर चर्चा करून फेरफार प्रकरणे निकाली काढण्याच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्यात आला. यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनघरी, ज्येष्ठ नेते उल्हास करपे, अरुण वासलवार, कुणाल गायकवाड, रायुकाँचे तालुकाध्यक्ष जयेश कारपेनवार आदी उपस्थित होते.

बॉक्स

...अन्यथा तीव्र आंदोलन

सदर फेरफारची प्रलंबित प्रकरणे महसूल विभागाने आठ दिवसांच्या आत मार्गी लावावे. असे न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस याविरोधात रस्त्यावर उतरेल व तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.