शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या व्यथांपुढे खाकीतील माणुसकी गहिवरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST

राकेश बोरकुंडावार सिंदेवाही : घरात अठराविश्वे दारिद्र्य. पोत्यांच्या फड्या करून विकणे हा कुटुंबाचा व्यवसाय. या व्यवसायात दोन वेळेचे जेवण ...

राकेश बोरकुंडावार

सिंदेवाही : घरात अठराविश्वे दारिद्र्य. पोत्यांच्या फड्या करून विकणे हा कुटुंबाचा व्यवसाय. या व्यवसायात दोन वेळेचे जेवण मिळेल, याचीही शाश्वती नाही. अशातच मुलीचे लग्न जुळले. लग्नाची तारीख ठरली. घरी पैसाच नसल्यामुळे लग्न जुळूनही सहजीवनाचे स्वप्न रंगवू शकत नाही ही दैना. ही बाब कुणीतरी भला माणूस खाकीतल्या माणसाला सांगतो. हे ऐकून खाकीतील माणूस अस्वस्थ होतो आणि थेट त्या कुटुंबाचे घर गाठून मदतीचा हात पुढे करतो. हे बघून त्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरत नाही. हे कोण्या चित्रपटातील कथानक नसून वास्तव आहे.

सिंदेवाही येथील जोशना कुकडकर या तरुणीचे लग्न जुळले. घरात आईवडील आणि जोशना असे हे कुटुंब. आईवडील पोत्याच्या फाड्या विकून आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटत आहेत. लग्न जुळल्याने मुलीच्या लग्नाची चिंता दूर झाली. २५ फेब्रुवारी ही लग्नाची तारीखही ठरली. मात्र, रोजचे जेवणाचे वांदे असताना मुलीचे लग्न कसे करायचे, या विवंचनेत जोशनाचे आईवडील होते. ही बाब कुणीतरी सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांना सांगितली. हे ऐकून तेही अस्वस्थ झाले. त्यांनी सहकाऱ्यांसह थेट कुकडकर यांचे घर गाठून स्वत: परिस्थिती बघितली. तेव्हा त्यांनाही याची प्रचीती आली. या कुटुंबाला शासकीय योजनांतून मदत मिळते काय याची चाचपणी केली. याशिवाय जोशनाचा विवाहासाठी लागणारी आवश्यक ती मदत पोलीस निरीक्षक घारे यांनी करून खाकीतही माणूस दडला असल्याचे दाखवून दिले. या मदतीने कुकुडकर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.

‘त्या’ कुटुंबालाही मदत

दोन दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील उटीमाल गावातील ममता कुंभारे (वय ६२) यांचे घर आगीत भस्मसात झाले. या महिलेसमोर जगण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला. पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात अन्नधान्य, कपडे व जीवनाश्यक वस्तूंसह आर्थिक मदतीचाही हातभार लावला.