शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:08 IST

मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देजार्ज एडवर्ड रिचर्ड : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीनिमित्त महाविद्यालयाच्या छोटूभाई पटेल स्मृती सभागृहात हा कार्यक्रम झाला. चर्चासत्राला शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, संशोधक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. चर्चासत्रात युजीसी मान्यताप्राप्त नियतकालिकेतील ६५ शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, संस्था उपाध्यक्ष रमेश मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ.अंजली हस्तक, डॉ.ए.पी.पिल्लई, अ‍ॅड. कुमकुम सिरपुरकर आदींची उपस्थिती होती. निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर उद्घाटनपर भाषणात दुर्लक्षित समाजाची व्याख्या स्पष्ट केली.ते म्हणाले, दुर्लक्षित समाज व मानव अधिकार या दोन्ही संकल्पना आजच्या समाज जीवनात अभ्यासणे व त्याचे विश्लेषण करणे काळाची गरज आहे. सिरपूरकर कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड.एस.वाय. सिरपूरकर व सुनंदा सिरपूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक प्राप्त विधी विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्यात येत असल्याची घोषणा केली. माजी प्राचार्य पिल्लई यांनी भारतीय संविधानातील तरतुदींची माहिती दिली.प्राचार्य डॉ. हस्तक प्रास्ताविक, संचालन उपप्राचार्य डॉ. बेन्नी एम.जे. व प्रा.डॉ.पूर्णेदू कार यांनी केले. आभार प्रा.डॉ.मनिषा आवळे यांनी मानले. यावेळी शफीक अहमद, अ‍ॅड. संजय सिरपूरकर, मंजूषा थोडगे, अ‍ॅड. अजित लाभे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, चकनलवार, डॉ. संजयकुमार सिंग उपस्थित होते.प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार व वक्ते म्हणून डॉ. अशोक पावडे, अ‍ॅड. जयश्री सातपूते, प्राचार्य डॉ. फडणवीस, प्राचार्य डॉ. चांडक, प्रा.डॉ.पंकज काकडे यांनी सत्रात सहअध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. संचालन अ‍ॅड. नंदिता नायर व अ‍ॅड. वनिता लालवाणी यांनी केले.