शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना बफरझोन क्षेत्रात पाठविलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

तेंदूपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या बेजबाबदार व बेकायदेशीरपणामुळे तेंदूपता संकलन करीत असताना खुशाल सोनुले या व्यक्तीचा  जीव गेला. बफरझोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र असून, या परिक्षेत्रात जाण्यास कोणालाही परवानगी नसते. असे असताना कंपनीने जबरदस्तीने वनविभागाच्या परवानगीने तेंदूपत्ता संकलनासाठी पाठविणे हे बेकायदेशीर असून, महाराष्ट्र वनकायद्याचा उल्लंघन करणारी ही बाब आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मजुरांना तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी वनविभागाने व तेंदूपत्ता कंपनीने बफरझोन क्षेत्रात पाठविले. हे क्षेत्र संवेदनशील आहे. त्यामुळेच भादुर्णी येथील खुशाल सोनुले या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला असल्याचा आरोप करून तेंदूपत्ता कंपनीवर आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने उपविभागीय अधिकारी मूल यांच्याकडे केली आहे.तेंदूपत्ता संकलनासाठी मे. प्रभात इंटरप्राईजेस रोलटोली गोंदिया या कंपनीच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीने तेंदूपत्ता संकलनाचे काम दिले असल्यामुळे मजुरांना बफरझोन क्षेत्रात  पाठविल्या जात होते. तेंदूपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या बेजबाबदार व बेकायदेशीरपणामुळे तेंदूपता संकलन करीत असताना खुशाल सोनुले या व्यक्तीचा  जीव गेला. बफरझोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र असून, या परिक्षेत्रात जाण्यास कोणालाही परवानगी नसते. असे असताना कंपनीने जबरदस्तीने वनविभागाच्या परवानगीने तेंदूपत्ता संकलनासाठी पाठविणे हे बेकायदेशीर असून, महाराष्ट्र वनकायद्याचा उल्लंघन करणारी ही बाब आहे. वनविभागाच्या कायद्यांनासुद्धा धाब्यावर बसवून राजरोसपणे हजारो मजुरांचे जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मे. प्रभात इंटरप्राईजेस रोलटोली गोंदिया व वनपरिक्षेत्र अधिकारी मूल हे दोषी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून मूलचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी  पं. स. च्या माजी सदस्य वर्षा लोनबले, अखिल भारतीय माळी महासंघ मूलचे ईश्वर लोनबले, नंदू बारस्कर, ओमदेव मोहुर्ले, गोपाळा सोनुले, मृतकाची पत्नी ज्योस्ना सोनुले,   हेमंत सोनुले, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग