शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अघोरी सुरक्षेचे पुन्हा किती बळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

गोंडपिपरी मागासलेल्या तालुक्याचा यादीत समाविष्ट आहे. उद्योग विरहीत असलेल्या या तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याला जंगलाने वेढले आहे. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने शेतपिकांना वन्यजीवांचा हैदोसाचा फटका दरवर्षीच बसतो.

ठळक मुद्देकुंपणावरील वीज प्रवाह धोकादायक : दोन शेतकरी व दोन वाघांचा मृत्यू

निलेश झाडेलोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात वन्यजीवांचा हैदोसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान होते. वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणत आहे. अशात हतबल झालेला बळीराजा कुंपणावर जिवंत विद्युत प्रवाह सोडून  अघोरी सुरक्षेचा नादी लागला. या अघोरी सुरक्षेने तालुक्यातीन तीन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे तर दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. ही अघोरी सुरक्षा पुन्हा किती लोकांचा बळी घेणार, असा प्रश्न आता तालुक्यात उपस्थित केला जात आहे.गोंडपिपरी मागासलेल्या तालुक्याचा यादीत समाविष्ट आहे. उद्योग विरहीत असलेल्या या तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याला जंगलाने वेढले आहे. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने शेतपिकांना वन्यजीवांचा हैदोसाचा फटका दरवर्षीच बसतो. शेतपिकांची वन्यजीवांकडून होणारी नासाडी हा गंभीर प्रश्न झाला आहे. शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे. 

शेतपिकात वन्यजीवांचा हैदोस हा शेतकºयांपुढे अतिशय गंभीर प्रश्न आहे. नानाविध उपाययोजना करूनही वन्यजीवांकडून नासाडी होतच असते. शेतपिकांच्या होणाºया नुकसानीच्या तुलनेत भरपाईची रक्कम अतिशय तोकडी असते. शेतकºयांनी नेमके काय करावे, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे.- प्रवीण मेश्राम, शेतकरी धाबा

शेताचा कुंपणाला विद्युत प्रवाह सोडण्याचा घातक प्रकार गोंडपिपरी तालुक्यात बघायला मिळतो. यात मानव आणि वन्यजीवांचा बळी गेलेला आहे. हे प्रकार बंद व्हावे यासाठी दरवर्षीच महावितरणतर्फे जनजागृती केली जाते.- टी. पी. लेकुरवाळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, धाबा

शेताभोवताल लावलेल्या तार कुंपणाला विद्युत प्रवाह सोडणे हे अत्यंत धोकादायक आहे. याबाबत दरवर्षी वनविभागाकडून जगजागृती केली जाते. हा प्रकार मानवाचा आणि वन्यजीवांचा बळी घेणारा आहे. हा प्रकार शेतकऱ्यांनी टाळायला हवा.-एस.जे.बोबडे  वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग धाबा.