शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी घर पाडले, उघड्यावर राहण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:18 IST

गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील एका वृद्ध महिलेला घरकूल मंजूर झाले. या घरकुलाला अजूनपर्यंत ना प्रशासकीय ना, तांत्रिक मंजुरी मिळाली. परंतु, ग्रामसेवकाच्या सूचना मिळाल्या आणि आपले निवासी घर पाडून टाकल्याचा प्रकार आक्सापूर गावात घडला.

ठळक मुद्देग्रामसेवकाच्या सूचना : वृद्ध महिलेवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील एका वृद्ध महिलेला घरकूल मंजूर झाले. या घरकुलाला अजूनपर्यंत ना प्रशासकीय ना, तांत्रिक मंजुरी मिळाली. परंतु, ग्रामसेवकाच्या सूचना मिळाल्या आणि आपले निवासी घर पाडून टाकल्याचा प्रकार आक्सापूर गावात घडला. महिनाभरापूर्वी बेघर झालेल्या या वृद्ध महिलेने ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार घर बांधकामाला सुरुवातही केली. खड्डे खोदले, विटा देखील खरेदी केल्या. मात्र घरकुलाचा शासकीय निधी तिला आजपर्यंत मिळाला नसल्यामुळे पुढील काम करणे अडचणीचे झाले आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार २०१७-१८ या चालू वर्षात आक्सापूर येथील लहानूबाई बाबाजी धोंडरे (६५) हिला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले. दारिद्र्य रेषेखालील हलाकीचे जीवन जगणाऱ्या या म्हातारीला स्वत:च्या मालकीचे घर होते. तुटक्या-फुटक्या झोपडीत ती कशीबशी जीवन जगत होती. यातच तिला घरकूल मंजूर झाल्याने तिच्या निवासाची समस्या मिटणार म्हणून आनंदाला पारावार उरला नाही. महिन्याभरापूर्वी आक्सापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप घडले यांनी स्वत: लहाणूबाईच्या घराला भेट देवून तिला येत्या दोन दिवसात तुमचे घर उखळून खड्डे खोदकामाला सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. याचवेळी लहाणूबाईने ग्रामसेवकाला घरचे लग्न आहे, एवढ्यात काम केल्यास आमचा रोजगार बुडेल, असे प्रति उत्तरादाखल सांगितले. परंतु, लाभार्थ्याचे काही एक ऐकून न घेता ग्रामसेवक दिलीप घडले यांनी रोजगार बुडले, लग्न सोडा, मात्र घर बांधा, अशी लहाणूबाईला ताकीद दिली. हे महाशय एवढ्यावरच न थांबता येत्या दोन दिवसात घरकुलाच्या कामाला सुरुवात न केल्यास तुमचे घरकूल रद्द होईल असे देखील सांगितले.त्यामुळे येथील लहाणूबाई धोडरे यांनी ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार बांधकामाला सुरुवात केली. त्यांनी आपले निवासी घरकूल पाडून टाकले. विटा खरेदी केल्या, सोबत इतर साहित्याची जुळवाजुळव देखील केली. मात्र लहाणूबाईच्या या घरकूल संदर्भात ग्रामसेवकाची पोल खोलणारा प्रकार महिनाभरानंतर समोर आला. या प्रकरणातील वास्तविक चित्र वेगळे आहे. लहाणूबाई धोडरे यांचे घरकूल तुर्तास मंजूर आहे. अजूनपर्यंत तिच्या घरकुलाला प्रशासकीय मंजूरी मिळाली नाही. तांत्रिक मंजुरीसुद्धा मिळाली नसतानाही दोन दिवसातच तुम्ही घरकुलाच्या कामाला सुरुवात करा, असा हेका आक्सापूरचे ग्रामसेवक दिलीप घडले यांनी वृद्ध महिलेपुढे रेटून धरला होता.आक्सापुरातील ही गरीब व वृद्ध महिला महिनाभरापासून उघड्यावर संसार करीत आहे. तिच्यावरचे छतच जमिनदोस्त झाल्याने तिने आता आभाळालाच आपल्या कवेत घेतले आहे. या परिस्थितीत मान्सूनची चाहूल लागली आहे. वातावरणात देखील तिव्र बदल दिसू लागला असून या म्हातारीने आता काय करावे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन घरकूल द्यावे किंवा ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.घरकूल मंजूर आहे, परंतु घरकुलाला प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी नाही. याही परिस्थितीत बांधकामाच्या कुणी सुचना दिल्या असल्यास या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करणार- दीपक सातपुते, पं. स. सभापतीगोंडपिपरीवरिष्ठांच्या सुचनेनुसार आपण कार्यवाही केली. वरिष्ठांचा निरोप आपण लाभार्थ्यापर्यंत पोहचविला व सुचनांचे पालन केले.- दिलीप घडलेग्रामसेवक, आक्सापूर