शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

घराघरांत लागली पक्षिघागर

By admin | Updated: April 18, 2015 01:15 IST

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे.

शंकरपूर: दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. या परिणामावर मात करण्यासाठी मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर विविध उपाययोजना करीत आहे. परंतु यात पशुपक्ष्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असतानाच चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील तरूण पर्यावरणवादी मंडळाने घरोघरी पक्षी घागर लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांना तहान भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी तहानेने व्याकूळ होऊन मृत्यूमुखी पडत आहेत. या पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाने मागील १२ वर्षापासून ‘पक्षी घागर’ ही संकल्पना घराघरांत पोहचविली आहे.तिव्र उन्हामुळे शेतशिवारातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना जीवदान देण्यासाठी तरुण पर्यावरणवादी मंडळाचे युवक सरसावले आहेत. गाव शिवारात ‘झाड तेथे पक्षीघागर’ ही मोहीम या मंडळाने कार्यान्वित केली आहे. मंडळाचे सदस्य शक्यतोवर जास्तीत जास्त घागरीत दररोज सकाळी पाणी साठवून पाखरांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत. गावातील ज्या नागरिकांच्या अंगणात झाडे आहेत, तेथे पक्षी घागर बांधण्यात येत आहे. यासोबतच जनजागृती म्हणून फेसबुकवर मॅसेज, व्हॉटस्अ‍ॅपवर संदेश तयार केला असून चौका-चौकात पक्षी बचाव, पक्षांना पाणी पाजूया या आशयाची फलके लावून जनतेचे लक्ष वेधले आहेत. यावर्षी मंडळाने ५०० पक्षी घागर तयार केल्या असून परिसरात व गावातील लोकांना त्याचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाला लागणारा आर्थिक निधी तरुण पर्यावरणवादी मंडळ वनविभाग ब्रह्मपुरी व चिमूर व शंकरपूर यांनी गोळा केला आहे. या उपक्रमात मंडळाचे सदस्य अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, मोरेश्वर पांगुळ, पवन राहुड, विजय गजभे, राहुल शेंडे, गारघाटे, संतोष कोरडे, वैभव हजारे, योगेश पचारे, महेश शिवरकर, सतीश भजभुजे, जगदीश पेंदाम, सोनु बावणकर, अमित शिवरकर, अमर दडवे, निरजंन शिवरकर, मेजर कासवटे, शुभम शिवरकर हे सर्व या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)