शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तप्त उन्हात आदिवासी विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:51 IST

राजुरा येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देराजुरा अत्याचार प्रकरण : आरोपींना फाशीची शिक्षा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. अंगाची लाही लाही करणाऱ्या ऊन्हातही मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.अशा आहेत मागण्याया संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आदिवासी समजाबद्दल बेताल वक्तव्य करणाºया नेत्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून त्वरित अटक करण्यात यावी. आरोपीची नार्को टेस्ट चाचणी करण्यात यावी.फास्ट टॅÑक न्यायालयात केस दाखल करून सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा. आदिवासी प्रकल्प कार्यालयातील हजलगर्जीपणा करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून प्रकल्प अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. अत्याचार पीडित मुलींची शासनातर्फे पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रत्येक पीषित मुलींना शासकीय नोकरी तसेच प्रत्येकी २५ लाख रूपये देण्यात यावे. राज्यातील सर्व खासगी, सरकारी, नामांकित शाळा, आश्रमशाळा येथील मुलींच्या वसतिगृहाची चौकशी करून अशा प्रकारचे प्रकरण पुन्हा होवू नये, यासाठी शासनाकडून सर्वकष धोरण ठरविण्यात यावे. शासकीय वसतिगृहातील डीबीटी योजना बंद करण्यात यावी. महाराष्टÑात सर्व आश्रमशाळा बंद करून तालुका, जिल्हास्तरावर निवासी शाळांची स्थापना करण्यात यावी.