शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घोडा रथयात्रेत भक्तांचा सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:45 IST

घोडा रथयात्रेच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे. या परिसरात मिना बाजार, खेळणीची दुकाने, मनोरंजन झुले, मिठाईचे दुकाने व संपूर्ण व्यापारपेठ सजली आहे. रविवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्यदिव्य लाकडी घोडा व रथ यावर श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार असल्याने क्रांतीनगरीत भक्ताचा सागर उसळला आहे.

ठळक मुद्देक्रांतीनगरी सजली : बुधवारी होणार गोपालकाला

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : घोडा रथयात्रेच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे. या परिसरात मिना बाजार, खेळणीची दुकाने, मनोरंजन झुले, मिठाईचे दुकाने व संपूर्ण व्यापारपेठ सजली आहे. रविवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्यदिव्य लाकडी घोडा व रथ यावर श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार असल्याने क्रांतीनगरीत भक्ताचा सागर उसळला आहे.या घोडा रथ यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. २० फेब्रुवारीला गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले असून श्रीहरी बालाजी मंदिरच्या प्रांगणात आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या माध्यमातून दरवर्षी उत्सवात वेगवेगळया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती उभारल्या जाते.यंदा गुजरात येथील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून ते यावर्षीचे आकर्षण ठरले आहे. चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज देवस्थानात मागील ३९२ वर्षांपासून दरवर्षी घोडा रथयात्रा उत्सव साजरा करण्यात येत आहे. १० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात विनोदबुवा खोड महाराज यांचे नारदेय कीर्तन होत आहे. या घोडारथ यात्रेसाठी गावागावातून भाविक चिमुरात दाखल झाले आहेत.