शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी अद्यापही कोरडाच

By admin | Updated: August 22, 2015 01:25 IST

पुर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला नागभीड तालुक्यातील घोडाझरी प्रकल्प आॅगस्ट महिना संपायला आला तरी कोरडाच दिसत आहे.

जोरदार पावसाची गरज : पावसाळी पर्यटकांचा हिरमोडघनश्याम नवघडे नागभीडपुर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला नागभीड तालुक्यातील घोडाझरी प्रकल्प आॅगस्ट महिना संपायला आला तरी कोरडाच दिसत आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे.या भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. आज या तलावापासून सिंदेवाही आणि नागभीड तालुक्यातील १५ हजार एकर शेतीला सिंचन होत आहे. सिंचनासोबतच या तलावाचा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून पुर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील पर्यटक या तलावाला नेहमीच भेट देत असतात.खरेतर पावसाळ्यात घोडाझरीला भेट देण्याची मजा काही औरच असते. तलाव ओव्हरफ्लो झाला की, सांडव्यावरुन फेसाळलेले ओसंडून वाहणारे धबधबे, समोर तुडूंब निळेशार जलाशय, तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि या टेकड्यावरची हिरवी गर्द वनराई हे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी आणि त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक रोजच या ठिकाणी हजेरी लावत असतात. याशिवाय पंचक्रोशीत वास्तव्यास असणारे शेकडो पर्यटक अगदी रोजच या ठिकाणी सामूहिक वनभोजनाचे आयोजन करीत असतात.असे असले तरी यावर्षी मात्र निसर्गाने पाठ फिरविल्याने म्हणावा तेवढा पाऊस या भागात झालाच नाही. परिणामी घोडाझरी तलाव भरलाच नाही. तलावच भरला नसल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. नाही म्हणायला पर्यटक अगदी बाराही महिने येथे भेट देत असतात. त्याप्रमाणे येथे पर्यटकांची वर्दळ सुरूच आहे. घोडाझरी पर्यटनस्थळाच्या व्यवस्थापनाने या ठिकाणी बालोद्यान, बोटींगची व्यवस्था केली आहे. इंग्रजानी १०९५ मध्ये बांधलेली निरीक्षणकुटी आणि तेलीफुलांनी बहरलेला बगीचा याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे येतच आहेत. पण जी मजा तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर पर्यटक लुटत असतात. त्या मजेपासून आज तरी पर्यटक पारखे झाले आहेत. केव्हा मोठा पाऊस येतो आणि तलाव ओव्हरफ्लो असे पावसाळी पर्यटकांना झाले आहे. त्यासाठी जोरदार पावसाची गरज निश्चितच आहे.