शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीच्या आशेने कापूस घरातच तुंबून

By admin | Updated: November 28, 2015 02:01 IST

घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली.

शेतकऱ्यांना जागेची पंचाईत : मायबाप सरकारवरच दरवाढीची आसप्रकाश काळे गोवरीघरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली. मात्र मायबाप सरकार आतातरी शेतकऱ्यांवर मेहरबान होईल आणि कापूस दरवाढ करेल, या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी घरीच कापूस ‘हाऊसफुल’ करून ठेवला आहे.कापूस पिकाचे दिवस आज वाईट आले आहे. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. उसनवारीने कर्ज काढून शेती पिकविली. मायबाप सरकार कापसाला यावर्षी चांगला भाव देईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपये दरवाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यावर्षीही पाने पुसली. शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणारे एकही राजकीय पुढारी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची कवडीमोल भावात विक्री करून आपली अडचण भागविली. शासनाने जाहीर केलेला चार हजार १०० रुपये हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी लावण्यासारखा आहे. एवढ्या कमी कापूस दराने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग शेतकऱ्यांनी नुकसान सहन करून कापूस विकायचा काय, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांना छळतो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या दु:खावर शासकीय यंत्रणेला कायमस्वरूपी उपाय शोधता आलेले नाही.कापूस घरी भरून ठेवला असल्याने शेतकऱ्यांच्या घरी राहायलाही जागा शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागेअभावी कापसावरच झोपून रात्रं काढत आहेत. मात्र हे शेतकऱ्यांचे धकधकते वास्तव एकाही राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही, हा एकच सवाल शेतकऱ्यांच्या काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते कुठे गेले, हे आता कळायला मार्ग नाही. कापूस दरवाढीसाठी वेळप्रसंगी जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरणारे शेतकऱ्यांचे कैवारी दोन-चार वर्षात कुठे आंदोलन करताना दिसले नाही आणि तसे केलेही असेल. तरी ही हाक मायबाप सरकारला का ऐकता आली नाही, यावर आज विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.