शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाच्या कापूस खरेदीची आशा धुसर

By admin | Updated: November 17, 2014 22:50 IST

पणन महासंघातर्फे राज्यात २७ केंद्रावरुन कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र ज्या केंद्रावर सीसीआयची खरेदी सुरू आहे तेथे पणन महासंघ त्यांचे केंद्र सुरू करणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे कोरपना

जयंत जेनेकर - वनसडीपणन महासंघातर्फे राज्यात २७ केंद्रावरुन कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र ज्या केंद्रावर सीसीआयची खरेदी सुरू आहे तेथे पणन महासंघ त्यांचे केंद्र सुरू करणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे कोरपना येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू असल्याने पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होईल की, नाही याची आशा आता धुसरच दिसून येत आहे.जिल्ह्यात कोरपना, वरोरा, चंद्रपूर, महाकुर्ला, टेमुर्डा, माढेळी, राजुरा, नागरी येथे कापूस खरेदी केंद्र आहे. यातील काही कापूस खरेदी केंद्र खासगी व्यापाऱ्यांची आहे. येथे कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. सद्य:स्थितीत कोरपना व वरोरा येथे सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे. कोरपना येथे गेल्या दोन वर्षापासून पणनने कापूस खरेदीच न केल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपला माल वणी, वरोरा, आदिलाबाद, मारेगाव, शिंदोला, आबई, वाकडी आदी ठिकाणी नेऊन विकावा लागला. कापूस उत्पादनात अग्रेसर असताना येथील जिनींग उद्योग डबघाईस येण्याच कारण अद्यापही कुणालाच उमजले नाही. गेल्या वर्षीही खासगी व्यापाऱ्यांनी जिनींगमध्ये कापूस खरेदी केली. परंतु पणनने खरेदी केली नाही. यंदा मात्र सीसीआयने येथे खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लुट काही अंशी थांबली आहे. मात्र यंदा शेतकऱ्यांना मिळणारा दर सीसीआयच्या नियमानुसार मिळणार असल्याचे समोर येत आहे. सीसीआय धाग्याच्या लॉबीवरुन कापसाचे दर ठरविते त्यामुळे पणनही याच नियमानुसार दर देणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सीसीआयच्या खरेदीसोबतच पणन महासंघाने येथे खरेदी करावी अशी मागणी आता तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची दरवर्षी खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लुट थांबण्यासाठी वेळेतच कापूस खरेदी सुरू करणे आवश्यक आहे. येथे त्वरित पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याची पणन महासंघाने तत्काळ दखल घेऊन प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)