बल्लारपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बल्लारपूर शहरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
समाजातील अनेक घटकांना प्रेरित करून कोरोनाकाळात जिथे सामान्य माणसाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशा परिस्थितीत मागील एक वर्षापासून पाळीव प्राणी व मुक्या जनावरांची नि:स्वार्थ भावनेने सेवा करणारी श्रुती लोणारे व पीडितांना न्याय देणारी सरिता मालू यांचा महिला दिनाच्या अनुषंगाने शाल व श्रीफळ देऊन महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश निषाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संगीता कार्लेकर व राकेश चिकाटे, विकास राजूरकर, अजय रासेकर, पारिष मेश्राम, देवानंद झाडे, विवेक गडकर, प्रशांत भोरे, घनश्याम बुरडकर उपस्थित होते. प्रास्ताविक पद्माकर पांढरे यांनी केले.