चंद्रपूर : साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेंढरी (मक्ता)द्वारे किलबिल येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी किलबिल प्राथमिक बालगृहातील आयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला विकास मंडळाच्या सरचिटणीस प्रा.प्रभावती मुठाळ, साईबाबा संस्थेच्या अध्यक्ष डॉ.ज्योती राखुंडे, उपाध्यक्ष वंदना खाडे, मीनाक्षी गुजरकर, सुलभा जक्कुलवार आदी उपस्थित होते. यावेळी किलबिल बालगृहात सेवा बजावणाऱ्यांना माताचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेच्या अध्यक्ष नंदाताई अल्लूरवार यांनी महिला दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले, प्रत्येक क्षेत्रात महिला यशाचे उंच शिखर गाठत आहेत. त्यांना घडविण्याचे श्रेय त्यांच्या मातेचे आहे. त्यासोबत ज्याला समाजाने दूर सारले, अशांना मायेचे प्रेम देऊन त्यांना घडविले. त्याचे कार्य फार मोठे आहे. केवळ महिला दिनीच नाही, तर सर्वच दिवशी महिलांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी महिला विकास मंडळाच्या सरचिटणीस प्रा.प्रभावती मुठाळ यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
किलबिल बालगृहातील मातांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST