शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

By admin | Updated: August 30, 2016 00:43 IST

राजुरा तालुक्याच्या वेकोलि परिसरातील साखरी येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा द्वारा संचालित प्रियदर्शिनी विद्यालयाच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार...

गं्रथालयाचे उद्घाटन : भारतीय कोयला मजदूर संघाचे आयोजनसास्ती : राजुरा तालुक्याच्या वेकोलि परिसरातील साखरी येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा द्वारा संचालित प्रियदर्शिनी विद्यालयाच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथील प्रियदर्शिनी प्रांगणात भारतीय कोयला खदान मजदूर संघातर्फे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रियदर्शिनी विद्यालयाच्या वतीने प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळाचे अध्यक्ष तथा राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅलीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, अनिल बंडीवार, महामंत्री रमेश बल्लेवार, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, भारतीय कोयला मजदूर संघाचे महिला प्रतिनिधी आशालता सिन्हा उपस्थित होत्या.यावेळी प्राविण्यप्राप्त विद्यार्थी स्वप्निल निवलकर, शालु काटवले, दिपक आस्वले, रूपाली उरकुडे, सोनाली गालफाडे, उषा बोरकुटे या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन मंत्री महोदयाच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टीकता यावे त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने वाचन आवश्यक आहे. त्याकरिता त्यांचा चांगली पुस्तके मिळावी, याकरिता शाळेच्या वतीने व लोकसहभागातून ग्रंथालय सुरू केले असून ग्रंथालयाचे उद्घाटनह पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव ठाकरे, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाराव वाभिटकर, सचिव मनोज पावडे, शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)