शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा बळकट करणे हीच दादांना घरी श्रद्धांजली

By admin | Updated: June 9, 2017 00:51 IST

८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी ..

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी त्यांच्या स्वप्नातील खेडे घडविण्यासाठी ग्रामसभांना मजबूत कसे करता येईल, याचा सांगोपांग विचार करून समस्त गुरूदेवभक्तांनी गीताचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली.गीताचार्य तुकाराम दादा यांनी आपले अख्खे आयुष्य ग्रामगितेवर आधारित खेडे स्वयंभू कसे होतील, यासाठी खर्ची घातले. त्याचा उत्तम प्रयोग त्यांनी अड्याळ टेकडीवर केला. कुठलीही शासकीय मदत न घेता केवळ श्रमदानातून गावगणराज्याचे नंदनवन फुलविले. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे कार्य सुरू होते. अड्याळ टेकडीवर दरवर्षी गीताचार्य तुकाराम दादा यांचा ८ जून रोजी स्मृतीदिन आयोजित करण्यात येतो. कोणाला कोणते निमंत्रण नाही. कोणाला कोणता सांगावा नाही. केवळ दादांवर असलेल्या श्रद्धेपोटी संपूर्ण विदर्भातून शेकडो गुरूदेवभक्त गुरुवारी अड्याळ टेकडीवर एकत्र आले होते. ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली. अगदी त्याच ठिकाणी या गुरूदेवभक्तांनी एकत्र येवून दादांना श्रद्धांजली अर्पण केली. याठिकाणी झालेल्या सभेत दादांच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी ग्रामसभा कशा मजबुत करता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले.जल, जंगल आणि जमीन यावर ग्रामसभेचा अधिकार आहे. एरवी ग्रामसभांना लोक येत नसले तरी ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली तर लोकांचे ग्रामसभेकडे आकर्षण वाढेल आणि ते ग्रामसभांना हजेरी लावतील. यासाठी ग्रामसभेतून रोजगार निर्मिती कशी होईल, याचा विचार करण्यात आला. ग्रामसभेच्या अधिकाराची माहिती देण्यात आली. ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी गुरुदेवभक्तांनी पुढे आले पाहिजे. हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे विचारही व्यक्त करण्यात आले.