शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल टू मोबाईल’ दारूची होम डिलिव्हरी

By admin | Updated: January 21, 2016 01:01 IST

चंद्रपूर जिल्हा दारूबंदी होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे, ...

पोलिसांचे दुर्लक्ष : जिवती तालुक्यात तेलंगणा राज्याची दारू संघरक्षित तावाडे जिवतीचंद्रपूर जिल्हा दारूबंदी होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे, हे सत्य नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका तेलंगणा राज्याला लागूण असल्याने जिवती तालुक्यात तेलंगणाच्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, ‘मोबाईल टू मोबाईल’ दारूची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार तालुक्यात सुरू आहे.भर चौकात किराणा दुकाण असो, हॉटेल किंवा पानटपरी असो, या ठिकाणी तेलंगणा राज्याची दारू दुप्पटीने विकताना पहायला मिळते. एखादा मद्यशौकीन ‘महाराष्ट्र की है क्या’ अशी विचारपूस केली तर ‘तेलंगणा की है, पिणा है लो, नही तो रहणे दो’ असे बोलल्या जाते. सीमेवरील परमडोली ताडा, नोकेवाडा, शेणगाव, झानेरी तसेच तालुक्याचे ठिकाण असलेल्या जिवती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरु आहे. हे सर्व उघड असतानाही येथील पोलीस प्रशासन गप्प का, हा विचार करण्याचा प्रश्न आहे. तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने विक्रेत्यांना येथून दारू आणणे सोईस्कर झाले आहे. येथे होलसेल दारूची विक्री होत असून पिणाऱ्यांकडून दुप्पट किंमत वसुल केली जात आहे. मजूर वर्ग दिवसभर केलेल्या रोजंदारीचे पैसे दारू विक्रेत्याच्या घशात घालतात व आपली तहाण भागवतात, अशा प्रतिक्रिया महिला वर्गाकडून ऐकायला मिळत आहेत. अवैध दारूने आमचे संसार मोडकळीस आले असून विकणारे पैसा कमवित आहेत. यामुळे दारूबंदीचा काय फायदा, असा प्रश्न महिला वर्ग उपस्थित करीत आहेत. सिंगम पोलिसवाला गेला कुठे?जिवती पोलीस स्टेशनमध्ये के. बी. शेळके हे दोन-तीन महिन्यापूर्वी ठाणेदार म्हणून रुजू झाले. आल्याआल्या त्यांनी तालुक्यात सिंगम स्टाईल कडक रुबाब दाखविला. अवैध धंद्यावर आळा बसविने आणि तालुक्यात शांतता, सुव्यवस्था कशी नांदेल यावर त्यांचा भर होता. वेळप्रसंगी वाईट वागणाऱ्यांच्या कानावर दोन वाजवायलाही मागे पुढे पाहत नव्हते. हे सर्व पाहुन जनताही खूष होती. पण सध्या तालुक्यात अवैध दारू विक्री खुलेआम पाहता त्यांच्यातला सिंगम नावाचा कडक गुण कमी दिसतो आहे.नाकाबंदी करणे गरजेचे संपूर्ण जिवती तालुक्यात तेलंगणाची दारू येत असून यावर आळा घालने कठीण नाही. जिवतीवरुन तेलंगणात जाण्यासाठी जे मार्ग आहेत, त्या रस्त्यांवर सीमेला लागून पोलीस चौकी लावून नाकाबंदी केल्यास दारू तस्करीवर आळा बसू शकते. परमडोली, येलापूर, लेंडीगुडा व भारी येथून तेलंगणात जाण्यासाठी मुख्य मार्ग आहेत. याच रस्त्याने दारू पार्सल होते. पण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने हे सर्व खुलेआम घडत आहे.