शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोकळ शेंगामुळे सोयाबीनची उतारी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा ...

ठळक मुद्देएकरी तीन पोते सोयाबीन उत्पादन : कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी तीन पोते सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यावर्षी बऱ्यापैकी पाउस येईल या आशेवर शेतकरी असतानाच गुलाबी बोंडअळीच्या भीतीपोटी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. सोयाबीन हे तीन महिन्याच्या कालावधीत होणारे पीक असल्याने दिवाळीत आर्थिक चणचण भागविण्यासाठी शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतो. परंतू यावर्षी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरत असतानाच अचानक पाऊस गायब झाला. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरला नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्या. या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी देऊन कसेबसे सोयाबीनचे पीक जगविले.यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. ऐनवेळी पिकांच्या भरणीवर पाऊस आला नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस पडला नसल्याने त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे . ज्या ठिकाणी वेळेवर पाऊस झाला त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले आहे. तर काही शेतकºयांना पावसाअभावी एकरी तीन पोते सोयाबीनचे एवढे कमी उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे?शासनाने शेतमाल हमीभावाचा कायदा केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांना व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कमी भावात शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा कायदा करण्यात आला. हमीभावापेक्षा शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंडाची तरतूद कायद्यात आहे. परंंतू व्यापाऱ्यांकडून शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे, असा सवाल शेतकरी विचारत आहे.माझ्या अडीच एकर शेतात यंदा सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु पावसाअभावी सोयाबीनचा दाणा भरला नाही. त्यामुळे सोयाबीनला पोकळ शेंगा लागून उत्पादनात घट झाली आहे.-प्रमोदन गजानन लांडे, शेतकरी, गोवरी