शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घोडपेठसह सहा गावात रंगमुक्त होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:21 IST

पारंपरिक पध्दतीने होळी सणाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडते. मात्र मागील काही वर्षांपासून होळी या सणाच्या निमित्ताने पर्यावरण व जल हे समाजाशी निगडीत प्रश्न समोर येत आहेत.

ठळक मुद्देआयोजनाचे चौथे वर्ष : गुरूदेव सेवा मंडळाचा प्रेरणात्मक उपक्रम

वतन लोणे ।ऑनलाईन लोकमतघोडपेठ : पारंपरिक पध्दतीने होळी सणाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडते. मात्र मागील काही वर्षांपासून होळी या सणाच्या निमित्ताने पर्यावरण व जल हे समाजाशी निगडीत प्रश्न समोर येत आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भद्रावती तालुक्यातील गुरूदेव सेवा मंडळांनी एकत्र येत रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन वर्षांपासून घोडपेठसह पाच गावात रंगमुक्त होळी साजरी करण्यात येत होती. यंदा आणखी एका गावाने या उपक्रमात सहभाग दर्शविला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवत व ‘होळी करा व्यसनांची, उधळण करा प्रेमाची’ या ब्रिदवाक्याला समोर ठेवून भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चालबर्डी (रै.), लोणारा (पारखी), चपराळा, हेटी व बोर्डा (वरोरा) या सहा गावांतील गुरूदेव सेवा मंडळे एकत्र येवून आपापल्या गावात रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरण पुरक अशी होळी साजरी करतात. ग्रामगीतेतील तत्वानुसार होळी म्हणजे ग्रामशुध्दीदिन आणी धुलिवंदन म्हणजे परस्परांतील मतभेद विसरून प्रेमभाव वाढीस लावणे. ग्रामगीतेमध्ये सांगितलेली ही मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन होळी व धुलिवंदन या दिवशी पाचही गावांमध्ये त्या-त्या गावातील गुरूदेव सेवा मंडळामार्फत एकाचवेळी लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. होळीच्या दिवशी ग्रामसफाई करून दिवसभरात जमा झालेल्या कचºयाची होळी करून ती जाळण्यात येणार आहे. या अग्निप्रकाशात गावातील नागरिक व्यसनमुक्तीचा संकल्प घेणार आहेत. परंपरेनुसार होलिका दहन करण्यासाठी लाकडांचा भरपूर वापर करण्यात येतो. यासाठी लाखो वृक्षांची कत्तल करण्यात येते. साहजिकच यामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. मात्र, ग्रामसफाईच्या माध्यमातून जमा झालेल्या कचºयाची होळी केल्यास पर्यावरणाचे रक्षणही होईल; शिवाय गाव स्वच्छ व सुंदरही होईल. परिणामी, नागरिकांना प्रदूषणमुक्त व चांगल्या आरोग्याचा लाभ घेता येईल. परंपरेनुसार सायंकाळी घरात बनविलेल्या गोड-धोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून हे अन्न होळीत समर्पित करण्यात येते. मात्र, यावेळी हे अन्न वाया जाऊ न देता एका ठिकाणी जमा करून गरजूंना वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.नागरिकांचे प्रबोधनधुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर न करता रंगमुक्त होळी साजरी करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कार्य सहाही गावांमध्ये गुरूदेव भक्तांकडून सुरू आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवसुध्दा साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी या संकल्पनेवर आपले विचार नागरिकांसमोर ठेवणार आहेत.अन् पर्यावरणपूरक होळीला प्रारंभतीन वर्षांपूर्वी भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथे रंगमुक्त होळीच्या संकल्पनेला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी गावातील ९० टक्के नागरिकांनी रंगांचा वापर न करता होळी साजरी करून ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविली. ग्रामगीताप्रणित रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करून जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी नवीन पायंडा घालावा, असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.