आॅनलाईन लोकमतसिंदेवाही: आयटक संलग्न महाराष्टÑ राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियन चंद्रपूरच्या वतीने रविवारी सिंदेवाही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल व सावली तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस कर्मचाºयांचा विभागीय संघर्ष मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शासनाच्जा मानधनवाढीच्या जीआरची होळी करण्यात आली.सप्टेंबर महिन्यात अंगणवाडी- बालवाडी कर्मचाºयांच्या हक्कासाठी एक महिन्याचा बेमुद्दत संप केला होता. तेव्हा राज्य शासनाने मानधन वाढ व भाऊबीजी म्हणून एक हजार रुपयांमध्ये वाढ करुन दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु, शासनाने मान्य केलेली भाऊबीज व मानधन वाढ याबाबत शासनाने अद्याप आदेश काढलेला नाही. तसेच अंगणवाडी कर्मचाºयांना पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन देण्याची घोषणा केली. त्यामुळे वेळेवर मानधन होईल अशी आशा होती. परंतु, अजुनही चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील ६० हजार सेविका व मदतनिसांना जून महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. याला कंटाळून परभणी जिल्ह्यातील सुमित्रा सवंडक या अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केली. अशी स्थिती संपूर्ण अंगणवाडी सेविकांवर आली आहे, अंगणवाडी कर्मचाºयांच्या निवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याला आयटक संघटनेनी विरोध केला आहे. तीन ते चार वर्षांपासून प्रवास भत्ता, रजिस्टर्स, छापील अहवाल फार्म देण्यात आलेले नाहीत. नागरी प्रकल्पातील इमारत भाडे, बळकटीकरणाचे पैसे न देता कार्यक्रम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे संघर्ष मेळाव्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शासन परिपत्रकाची (जी. आर.)ची कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करुन सरकार विरोधी तिव्र निदर्शने केले. तसेच १८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी आक्रोश मोर्चा करुन मुख्यमंत्र्यांला घेरण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी आयटक संघटनेचे राज्य महासचिव तथा अंगणवाडी नेते श्याम काळे नागपूर, आयटकचे जिल्हा सचिव तथा अंगणवाडी नेते विनोद झोडगे, अंगणवाडी युनियनचे चंद्रपूर, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, श्रीधर वाढई, शोभा मेश्राम, कमल बारसागडे, कुंता वाकडे, बेबीताई बोरकर, कालिंदा ढोक, संगीता चौधरी, विमल भोंगारे यासह चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल व सावली तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविकांनी केली जीआरची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:19 IST
आयटक संलग्न महाराष्टÑ राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियन चंद्रपूरच्या वतीने रविवारी सिंदेवाही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल व सावली तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस कर्मचाºयांचा विभागीय संघर्ष मेळावा पार पडला.
अंगणवाडी सेविकांनी केली जीआरची होळी
ठळक मुद्देसिंदेवाहीत संघर्ष मेळावा : हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार