शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराचे कॉलर पकडून बुक्क्यांनी मारहाण

By admin | Updated: September 25, 2016 01:17 IST

पोलीस हवालदाराच्या कामात अडथळा व ठाणेदार बंदोबस्ताकरिता जात असताना अश्लील शिवीगाळ केली.

आरोपींना अटक : पोलीस गाडीचा आरशा तोडलाघुग्घुस : पोलीस हवालदाराच्या कामात अडथळा व ठाणेदार बंदोबस्ताकरिता जात असताना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर कॉलर पकडून तोंडावर व डोक्यावर बुक्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान राजीव रतन दवाखान्या नजीक घडली. आरोपीने पोलीस वाहनाच्या आरशाला बुक्की मारून तोडले.या प्रकरणी नैशाद शेख व विनेश कलवल यांच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. चंद्रपूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सायंकाळी एक व्यक्ती पडून असल्याची माहिती फोनवरून ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पोलीस हवालदार संतोष गुप्ता घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी लोकांच्या मदतीने त्या इसमाला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करीत असताना नौशाद शेखने मोबाईल वर फोटो घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित लोकांनी ‘ आधी दवाखान्या नेऊ द्या, मग फोटो घ्या, असे म्हणताच ‘आज अंभोरे की उतारकेच रहुंगा’, असा दम देत अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती पोहवा गुप्ता यांनी ठाणेदारला दिली. ठाणेदार अंभोरे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्ताकरिता व्हीआयपी गेस्ट हाऊसकडे जात असताना शिवीगाळ करणारे दोघेही राजीव रतन दवाखान्या समोरील दुकानात उभे असल्याचे दिसले. त्यांनी गाडी थांबवली असता शिवीगाळ करीत गाडीजवळ येऊन गाडीच्या साईड ग्लासला बुक्की मारून तोडला. गाडीत बसून असलेले ठाणेदार गाडीच्या खाली उतरत असताना त्यांचे कॉलर पकडून तोंडावर व डोक्यावर बुक्क्याने मारून इजा पोहोचविली. दरम्यान, सोबत च्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. शुक्रवारी नेहमीप्रमाणे विनेश कलवल हा नौशाद सोबत होता. त्याला मदत केल्यामुळे दोघांवर भादंवि ३५३, ३३३, २९४, ५०६, ४२७(३४) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार शुक्रवारपासून खमंग चर्चेचा विषय झाला आहे. (वार्ताहर)आरोपीविरोधात खंडणीचे गुन्हेनौशाद हा चंद्रपूरवरून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्राचा स्थानिक बातमीदार म्हणून काम करतो. मागील काही दिवसांपूर्वी खंडणी, धमकी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून कळते.